पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८

इच्छा असणें, मदत करणें, दानधर्म करणें, माणसाच्या हातून चुक्या होणार नाहींत असें करण्याची, त्यांची चित्तवृत्ति गुंग करून टाकणाऱ्या गोष्टींचा उलगडा करण्याची, त्यांच्या विपत्ति कमी करण्याची, व आपणांस ज्या स्थितींत जग आढळलें त्या- पेक्षां तें जास्त सुखांत ठेवून मरण्याची इत्यादि इच्छा बाळगणें ह्या सुविचारांस सामाजिक हिताचे विचार असें विशेष टलें आहे; त्यांपासून इतरांचें हित होतें इतकेंच नव्हे; तर स्वतःचें देखील होतें.”
 बिशप बटलर ह्मणतो:-" ह्या संसारांत कांहीं सुखें आहेत, ती सर्वसाधारण असतात; उदाहरणार्थ शांतता, अबादानी, स्वातंत्र्य, आरोग्यदायक ऋतु. पण, आपल्या बांधवांवर उपकार करण्यामुळे सर्वसाधारण सुखाची खरी कल्पना येते. कारण, आपण लोकांवर जितकी प्रीति करितों तितकीं त्यांचीं सुखदुःखें आपली होतात. अहंभावामुळे खासगी हिताहिताची कल्पना आपणांस येते, व तें आपलेंसें वाटावयास लागतें. शेजाऱ्या- पाजाऱ्यांवर प्रीति केली ह्मणजे त्यांचें हिताहित तेंच आपलें, व त्यांत आपण भागीदार आहोंत असें वाटावयास लागतें. ह्या री- तीनें औदार्यबुद्धि हा आपल्या बांधवांच्या हिताहितांकडे लक्ष पुरविण्यास लावणारा एक वकील आपल्या हृदयांत आहे.”

 पुढें दिलेल्या मार्क ओरिलिअसच्या उदात्त विचारांप्रमाणें "तुझ्यांत असलेला ईश्वराचा अंश, मर्दपणांत आलेल्या राजकीय कामांत गुंतलेल्या तुझ्या देहाचा रक्षक होवो. तूं जो रोमन, राज- कर्ता, आपल्या नेमून दिलेल्या स्थानी, मर्दाप्रमाणें, खुणेची वाट पहात, कोणाच्या शपथेची अथवा पुराव्याची पर्वा न बाळगतां


 १ आर्नल्डचें “शिक्षण व झोटिंग पादशाही."