पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४७

बहादुरी दिसत नाहीं व जीं त्रासदायकही वाटतात, अशीं कामें करण्याकरितां तीं खर्चावीं लागतात. पण, तीं कामें देखील कमी जरूरीचीं असतात असें नव्हे.

 सार्वजनिक कामें - ह्मणजे कमिट्या, मुकत्यारांची निवड, सभा, भाषणे, देवळाच्या व्यवस्थेबद्दलच्या सभा, प्रांतिकसभा इत्यादि गोष्टी मनोरंजनाच्या नव्हत. त्या कल्पनाशक्तीला दिप- वून टाकीत नाहींत. त्यांच्यामुळे अंगांत स्फुरण येत नाहीं; पण, लढाईच्या वेळीं जसे शस्त्राघात तशीं शांततेच्या वेळीं मतें. व तीं शांततेच्या वेळचीं व त्यांच्यामुळे रक्तपात होत नाहीं, ह्मणून तीं कमी कार्यसाधक आहेत असें नव्हे. मत देणें हा आपला हक्क असें समजूं नये, तर तें आपलें कर्तव्य असें मानावें. व तें देतां यावें अतएव आपली तयारी करणें हेंही आपलें कर्तव्य.
 किती सार्वजनिक काम फुकट होतें हें आश्चर्य करण्याजोगें आहे; आणि तें तसेंच चालावें. व ज्यांनीं ह्या कामास शक्य- नुसार हातभार लाविला नाहीं, निदान थोडें तरी काम केलें नाहीं, - कारण, सर्वास सारखी फुरसत सांपडते किंवा सारखे प्रसंग येतात असें नव्हे - त्यांस ह्या सार्वजनिक कामांपासून होणारा फायदा घेण्याचा हक्क नाहीं.
 बेकन ह्मणतोः–“स्वतःसाठीं पैसा मिळविणें हा नरदेहास साजणारा मुख्य हेतु असूं शकणार नाहीं.” घरेंदारे, अन्नपाणी, कपडालत्ता इतक्याच वस्तु जरूरीच्या नव्हत; किंवा त्या सर्वोत जास्त जरूरीच्या आहेत असेंही नव्हे.
 अगदीं संकोचित मनानें व स्वार्थबुद्धीनें विचार केला, तरी जनसेवेमध्यें खर्चिलेला वेळ फुकट गेला असें होत नाहीं. कारण " आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांशीं ममतेनें वागणें, काम करण्याची