पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६

होतील, तसतशीं तीं सुधारणेच्या जवळजवळ येत जातील. आपण सर्वांनीं सुखी होण्याचा यत्न केला तर किती सुखी होऊं हें आपणांस क्वचितच कळतें.
 “सर्वांस बहादुरी मारितां येत नाहीं, अथवा एखादें मोठें धाडसाचें किंवा जें जणूं भीतीस गुंडाळून ठेवितें असें काम करून सर्व जगाला थक्क करून टाकितां येणार नाहीं; पण, प्रामा- णिकपणाचीं व उदारपणाची कृत्यें करून आपला आयुष्यक्रम भरून टाकितां येईल. उदात्त माणसांनीं करण्याचीं बरींच उदात्त कृत्यें जगांत आहेत.”
 इंग्रज ह्मणवून घेणें हा एक मोठा हक्क आहे. इतकी स्वतं- त्रता व्यक्तिमात्रास कोणत्याही राज्यांत नाहीं. न्यायदृष्टीस सर्व सारखेच आहेत. गुन्हा शाबीत होईपर्यंत प्रत्येक माणूस निरप- राधी मानिला जातो. त्याच गुन्ह्यासाठीं दोन वेळ खटला होत नाहीं. चौकशी उघड झाली पाहिजे, व आरोपीस फिर्यादीबरो- चर तोंडातोंडी करण्याचा हक्क आहे. स्वतःवर खटला आला असतां स्वतःला निकाल लावितां येत नाहीं. अथवा योग्य अधिकाराशिवाय कोणास शिक्षा करितां येत नाहीं.
 तेव्हां, खर्चाकडे किंवा धोक्याकडे न पाहतां, देशाची सेवा करणें हैं एक गंभीर कर्तव्य होय. “मरण येणारच, व सद्गु- णांची कीर्ति शाश्वत आहे. त्या अर्थी जो मनुष्य मरणाच्या किंवा संकटांच्या भीतीनें देशसेवा टाळितो, अथवा आपल्या नांवास हीनपणा आणितो, तो जिवंत रहाण्यास योग्य नाहीं. "

 विचार करून पाहिल्यास, आपल्या देशाची सेवा थोड्याच प्रसंगी धोक्याची होते. चित्ताची समाधानी व फुरसत हीं कांहीं प्रमाणानें खर्ची घालावी लागतात, व कधीं कधीं ज्यांत फारशी


 १. सी. ए. मेसन..