पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५

ह्या जगाची रचनाच अशी गूढ आहे कीं, आपणांस बऱ्याच गोष्टींसाठीं शेजाऱ्यापाजाऱ्यांवर अवलंबून रहावें लागतें. पण शक्य असेल तितकें स्वतःच्या श्रमांवर अवलंबून रहाण्यास प्रत्येकानें शिकले पाहिजे.
 आपणांस जें उत्तम दिसतें तें लोकांस उत्तम दिसेल अशी आशा करणें फुकट आहे. ह्मणून त्यांच्या मताप्रमाणें जें उत्तम असेल तें साध्य करून घेण्यास त्यांस मदत करावी, व आत्मो- न्नतीच्या त्यांच्या यत्नांस हातभार लावावा. लोक आपल्या पा- ठीची कटकट जावी ह्मणून - खऱ्या कळवळ्याने नव्हे - अघळपघळ पैसा देतात. असे लोक पैशाचा दुरुपयोग करितात. पण, एक- दरींत स्वजातीसाठीं काम करणें शेवटीं फलदायकच होतें. स्वतःसाठीं जें काम करितों त्यापेक्षां इतरांसाठी काम करण्यांत जास्त सुख वाटतें; लोकांसाठीं अगदीं थोडें काम केलें तरी तें पूज्य आहे.
 काम कितीही हलक्या प्रतीचें असो तें मनापासून करा. सर टी मूर ह्मणतो :- “जें काम पत्करिलें असेल तें स्वसामर्थ्यानुरूप योग्य रीतीनें करा, व त्यांतच आनंद माना. xxxx सहवासानें अंगांत जडलेले दुर्गुण काढण्याचा यत्न करा; तसें होणें शक्य नाहींच. तरी पण ह्याकरितां राज्यकारभार सोडून देऊ नका; वादळाच्या वेळीं वारा ताब्यांत रहात नाहीं, किंवा तो बंद पा- डितां येत नाहीं ह्मणून तारूं सोडतां कामा नये. प्रसंगास अनु- सरून गोष्ट जितकी शहाणपणानें व चांगली करणें तुमच्या हातीं असेल तितकी करा. व जी सुधारतां येत नाहीं ती अधिक बिघडणार नाहींसें करा; सर्व माणसें चांगलीं झाल्याशिवाय बऱ्याच गोष्टी चांगल्या होणार नाहींत; व मनुष्यजाति चांगली होण्यास बरींच वर्षे लागतील असें मला वाटतें.”
 पण, जसजशीं माणसें कर्तव्यकर्मास अधिकाधिक जागृत
 १३