पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४३

मोठमोठ्या शहरांतील आरोग्यंस्थिति असावी तशी चांगली नाहीं. शास्त्रविषयांत नुक्ता कोठें प्रवेश झाला आहे.
 उन्नतीचा प्रश्न एकीकडेस केला तरी समाज अव्याहत चाल- ण्यास सारखी मेहनत पाहिजे. पार्लमेंतांतलें कामकाज, शहराची अंतस्थ व्यवस्था, अनाथ लोकांच्या व्यवस्थेचा कायदा इत्यादि समाजाच्या कामाकरितां स्वतःच्या कामाइतकीच काळजीनें व्यवस्था करावी लागते, व तीकडे तितकेंच लक्ष पुरवावें लागतें. बहुतेक कामें समाजपंचायतीच्या धोरणाने व्हावीं असा दिसत आहे, मग तो बरा असो वा वाईट असो.
 पुनः कंगाल लोक आहेतच; पण, धर्मादाय संस्था, गरीब व श्रीमंत ह्यांचें एकमेकांवरलें प्रेम, अनाथ लोकांच्या पोटगीचा कायदा, अनिरुद्ध व्यापार व अगदीं निकृष्ट नाहीं अशी देशाची स्थिति, इत्यादि गोष्टींमुळे, इतर देशांत लोकांचा जसा सोशालि- झम (समाजस्वातंत्र्य) व झोटिंग पादशाही ह्यांच्याकडे कल असतो, तसा आमच्या देशांत नाहीं. कार्योत्साह जग हालवूं शकतो, पण निर्फल होणारे अनुभव घेण्यांत किती वेळ व पैसा मोडतो ह्याचा विचार केला तर वाईट वाटतें. अनुभवाकरितां केलेले जे प्रयोग पूर्वी वारंवार फुकट गेले व जे, ज्यांच्या सुखाकरितां ते करावयाचे त्यांना सुख देण्याच्या ऐवजीं त्यांचें नुकसान करितात, ह्मणून कुचकामाचे ठरले, अशा प्रयोगांसाठी किती पैसा व वेळ मोडतो ह्याचा विचार केला तर वाईट वाटतें. गरीब लोकांसाठी काम करण्यास धर्मबुद्धीची जरूरी आहे; त्याचप्रमाणें विचाराची जरूरी आहे, हें लोक फारसें लक्षांत ठेवीत नाहींत.
 त्यांची स्थिति सुधारण्यास मुख्य पैसा पाहिजे असें नाहीं. ह्या विषयावर अधिकाराने बोलण्यास योग्य मिसेस सिवेल ह्मणते:-