पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२

 नागरिक कर्तव्ये नीट व शहाणपणें बजावितां यावीं ह्मणून कांहीं गोष्टी अवश्य आहेत. त्या बर्कच्या मताप्रमाणें ह्या होत. "आपल्या मनाची उन्नति काळजीनें करावी. आपल्या स्वभावांत ज्या उदारपणाच्या व सत्यस्वरूपी भावना असतील त्या पूर्ण वाढीस व जोरास आणाव्या. समाजांत जी वर्तणूक माणुसकी साजणारी असते, तीच वर्तणूक राज्यकारणीं व लोकसेवेच्या वेळी असावी; ह्मणजे स्वदेशाभिमान अंगी बाळगून, सभ्यपणाहि असावा. लोकांत पुढारकी घेतली कीं, हातीं सत्ता येते व त्या वेळी तरतरी पाहिजे. जो आपल्या कामाची हयगय करितो तो, व जो शत्रूस जाऊन मिळतो तो, हे दोघेही कर्तव्यास मुक- तात. आपले हक्क मागण्यापेक्षां आपलें कर्तव्य बजावणें हें चांगलें. "

 बोलिंग "स्वदेशाभिमानाचें वारें" ह्या निबंधांत साक्रेति- साचें एक मत देतो. तें असें :- “आपल्यास जो धंदा येत नाहीं, तो धंदा, मग अगदीं क्षुल्लक कां असेना, कोणी पत्करीत नाहीं. पण, सर्वात कठिण जो धंदा राज्य चालविणें तो धंदा चालवि- ण्यास आह्मी पुरेसे योग्य आहोंत असें प्रत्येकास वाटतें.” ग्रीस देशाच्या आपल्या अनुभवावरून तो हैं ह्मणतो; आज तो इंग्लंदांत रहात असता तरी देखील त्यानें आपलें मत बदललें नसतें.

 फार निकडीच्या मोठमोठ्या प्रश्नांचा आपणांस निकाल लावा- वयाचा आहे. आपल्या मुलांबाळांस शिक्षण देण्याचें काम आहे. पण, शिक्षणपद्धति अगदीं बरोबर आहे असें कोणास ह्मणतां येणार नाहीं. भांडवलवाले व मजूर ह्यांच्यामधील भांड- णांनीं आपला व्यापार बसत चालला आहे. व्यापाराचे पदार्थो आडकाठी होते आहे; हें सारखें चाललें तर शारीरिक श्रमाची जरूरी कमी होऊन वेतन कमी होत जाईल. आपल्या