पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जनावरें मात्र स्वतःला दुःख करून घेत नाहींत, पण मनुष्य करून घेतो. “मनुष्य लटक्या मायेंतून चालला आहे. आणि कारणाशिवाय स्वतःला त्रास करून घेतो.” आपण संशय, भीति, चिंता इत्यादींनीं स्वतःला ग्रासून घेतों. आपण सर्व बाजूंनीं रहस्यानें वेढलेले आहोंत. परंतु त्याला त्रासतां कामा नये.

 आपण त्याला त्रासतां कामा नये. पण सावध रीतीनें वागलें पाहिजे. ज्या ठिकाणी फारशी चुकी होणार नाहीं असें वाटतें त्या ठिकाणीं देखील सावध असलें पाहिजे. लार्ड चेस्टरफील्ड म्हणतो- “ आपले सद्गुण योग्य आटोक्यांत ठेवण्यास जितकी खबरदारी ठेवावी लागते त्यापेक्षां प्रतियोगीभावाने असणारे दुर्गुण टाळण्यास कमी खबरदारी लागते. दुर्गुणाचें खरें स्वरूप इतकें ओंगळ असतें कीं, तो पाहिल्याबरोबर मनांत तिटकारा उत्पन्न होतो. व सद्गुणाच्या रूपानें तो आरंभीं आपणा भासला नाहीं तर आपलें मन त्याकडे ओढावयाचेंच नाहीं.” अंगीं मुळचें सौजन्य असून ज्यांनीं आपलें हृदय निर्दय व कठोर करून घेतलें आहे असे लोक सर्वाना आढळतात. लार्ड पामर्स्टननें, सर्व मुलें जात्या चांगलीं असतात असें ह्मणून, धर्मविद् लोकांची खरमरीत टीका आपणावर ओढवून घेतली होती. तरी पण मनुष्य अगदीं दुष्ट होण्यास खरोखर बराच वेळ लागतो.

 “जेगांतील खोटसाळपणाच्या व्यवहारानें मनुष्य एकदम बिघडत नाहीं. आपला जन्मस्वभाव बदलण्यास बराच वेळ लागतो, व बरेच श्रम पडतात, ही एक ईश्वराची मोठी दया होय. ज्याप्रमाणें व्हल्कन आकाशांतून एका दिवसांत भ्रष्ट झाला त्याप्रमाणें आपण सद्गुणांपासून एकदम हरत नाहीं. "

 ह्याप्रमाणें आपण व्यक्तीचा विचार केल्यावर जातीबद्दल


१ सर टामस ब्राऊन.