पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार करूं लागलों ह्मणजे, अनुकूल गोष्टींची जी आपण हयगय करितों ती अधिक आश्चर्यकारक वाटेल. अद्यापि मनुष्य जातीला न्यूटनप्रमाणेंच ह्मणावें लागत आहे, -" आह्मी सर्व ज्ञानसमुद्राच्या किनाऱ्यावरच मुलांप्रमाणें खेळत आहोंत, व मधून मधून नेहमीपेक्षां अधिक सुंदर शिंपा, अधिक नाजूक गवत गोळा करीत आहोंत एवढेच. बाकी ज्ञानाचा तो अज्ञात महासागर आमच्या पुढें तसाच पसरलेला आहे." ज्याचे सर्व उपयोग व सर्व धर्म आपणांस माहीत आहेत असा एकही पदार्थ नाहीं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण खपत असतो. पण पदार्थाचे गुण, धर्म, व सृष्टीचे स्वतःसिद्ध नियम ह्यांचा पूर्ण उपयोग करून घेतां आला असता तर एक दोन तास श्रम करून आपल्या शरीरास लागणाऱ्या व अवश्यक सर्व गरजा पुज्या झाल्या असत्या, व आपल्या मनाची व मनोभावांची उन्नति करण्यास पुरेसा वेळ राहिला असता.

 वाफेचा आपण जेवढा उपयोग करून घ्यावा तेवढा करून घेत नाहीं. आह्मी लहान असतांना विजेचा उपयोग लोकांना माहीत नव्हता. आतां तरी तो नुक्ताच कोठें कळूं लागला आहे. अद्यापि नद्यांचा वेग फुकट जात आहे. माणसाला बेशुद्ध कर- ण्याची युक्ति पूर्वी सांपडली असती तर किती असह्य दु:खें M करितां आलीं असती. असल्या प्रकारची उदाहरणें घेऊं लागलों ह्मणजे तीं संपविण्यास एक निराळा ग्रंथ लागेल. हजारों नवीन शोध पुढे लागणार आहेत किंवा लागण्याच्या सुमारांत आहेत असें कोण कबूल करणार नाहीं ? हा अफाट ज्ञानसागर आपल्या पुढें अज्ञात असा पसरलेला असतांना, एकमेकांचा नाश कर- ण्यांत, आणि मुलुखांकरितां पशूंप्रमाणें भांडण्यांत कोट्यावध रुपये ख्रिश्चन ह्मणवून घेणारीं राष्ट्रें खर्ची घालतात — निव्वळ