पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१

 राष्ट्रांच्या एकमेकांबरोबरच्या व्यवहारांत जो मत्सर व वैरभाव दिसून येतो तो अंतस्थ राजकीय व्यवहारांतही दिसून येतो. पण, नुसत्या शिव्या देणें हा वादविवाद नव्हे; तसें करणें ह्मणजे आपला पक्ष हीन आहे असें कबूल करण्यासारखें होय. "जेव्हां पक्षपक्षांतून व राष्ट्रांराष्ट्रांतून युद्धाची धमकी देऊन, अथवा चुकणाऱ्या बंधूंचा सूड उगविण्याची ओरड करून मान खालीं करून घेण्याचें आह्मी बंद करूं, व त्याच्या ऐवजीं माणसें भावंडें आहेत, व त्यांनी एकमेकांबद्दल पूज्य बुद्धि व प्रेम बाळगावें हा ईश्वरी नियम आह्मी शिकवूं लागूं तो आनंदाचा दिवस खरी. "
 मोठमोठीं राज्यक्रांतीचीं कामें दरबार भरून व अत्तरगुलाब देऊन होत नसतात. तथापि ह्या जगांतल्या घडामोडींत विशेष महत्वाच्या बऱ्याच गोष्टी शस्त्रांच्या सहाय्यापेक्षां फक्त वादविवादानें झालेल्या जास्त सांपडतील; व ज्या ठिकाणीं शस्त्रांचा उपयोग पडला त्या ठिकाणी देखील, लेखणीनेंच शस्त्र चालवावयास लाविलें. संगिनीपेक्षां विचारशक्ति जास्त बलवान् आहे.

 मिल ह्मणतो- “साधारणपणें मनुष्यजाति उन्नतीच्या पहिल्या पायरींत आहे. तेव्हां ह्या वेळीं सर्व मनुष्यप्राण्याविषयीं आपले- पणाची बुद्धि मनांत वागणें अशक्य आहे. ह्या बुद्धीच्या योगानेंच आयुष्यांत, मनुष्याचा साधारण वर्तनक्रम ठरविण्यांत खरा द्वैत- भाव असणें अशक्य होतें. ज्या लोकांत सामाजिक सुखाची इच्छा थोड्या प्रमाणानें तरी जागृत झाली आहे, त्यांस इतर लोक सुखाची साधने मिळविण्याच्या कामांत आपले प्रतिस्पर्धी आहेत व आपला हेतु सिद्धीस जावा ह्मणून त्यांचा नाश झाला पाहिजे, इत्यादि विचार मनांत बाळगणें बरें वाटत नाहीं."


 १ व्हिटिअर.