पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०

करावें लागतें. इतालीचे नुक्तेच प्रसिद्ध झालेले खलिते जो वाचील त्याला तेथल्या शेतकऱ्यांची काय दैन्यावस्था झाली आहे हे दिसून येईल. यूरोपांत वेतन थोडें, श्रम फार. फ्रान्सांतील लहान जमीनदारांची स्थितीही फारशी चांगली नाहीं. दिवसा फक्त आठ तास काम करण्याच्या सूचनेस माझी पूर्ण सम्मती आहे. तिगस्तां हाइडपार्कमध्यें जो ठराव कबूल झाला, तो इतर सर्व राष्ट्रांस कबूल झाला पाहिजे. पण, युद्धखात्याची व्यवस्था सध्यांसारखीच राहिली तर कामाच्या तासांत कांहीं कमी होण्याचें शक्य नाहीं. आठ तास काम ठरवितां यावें एतदर्थ युद्धखात्याचा खर्च कमी झाला पाहिजे. आरमार व सैन्य ह्यांचा खर्च चालविण्यास प्रत्येक पुरुषास व प्रत्येक बायकोस दिवसा वाजवीपेक्षां एक तास जास्त काम करावें लागतें. वस्तुतः यूरोपांतला धर्म ख्रिस्ती धर्म नव्हे. युद्धाभिमानी देव शुक्र ह्याची उपासना होय. आपणांस युद्ध बंद करितां येत नाहीं ! पण, निदान शांततेच्या बाजूस आपलें वजन पडलें पाहिजे, व पर- राष्ट्रांबरोबर नेकीनें, मित्रभावानें, सभ्यपणानें, व औदार्यानें बाग- ण्याचा आपण यत्न केला पाहिजे.
 पुष्कळ राष्ट्रें मूर्खपणें पैशाची टंचाई पडली ह्मणून युद्ध करितात.
 कूपर ह्मणतोः–“जीं राष्ट्रें येरव्हीं पाण्याच्या थेंबाप्रमाणें एक झालीं असतीं, तीं पर्वताची ओळ मध्ये आली ह्मणून शत्रू बनली आहेत." पण राष्ट्रांनी स्वतः होऊन एकमेकांच्या मैत्रींत विरोध आणणारे जे प्रतिबंध करून ठेविले आहेत ते अतिशय वाईट असतात. ह्मणजे करांसंबंधानें, अथवा जकातीसंबंधानें, किंवा ह्यांच्याहीपेक्षां वाईट, कोणत्याही पक्षाच्या मनांत इतराबद्दल चाईट बुद्धि वागत नसतांना ती बळेंच अंगीं लावणें व त्यामुळे जो मत्सर व जें वैमनस्य उत्पन्न होतें त्यासंबंधानें.