पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३९

कडे जातो; आणखी एक तृतीयांश मागील युद्धांसाठीं ह्मणून द्यावा लागतो; व राज्यकारभार चालविण्याकरितां फक्त एक तृतीयांश रहातो. स्वार्थनाश होईल असल्या गोष्टी अ- नेक आहेत, आणि राष्ट्रांच्या हिताहितांच्या गोष्टी एकमेकांशीं इतक्या चिकटून आहेत कीं, प्रत्येक युद्ध यादवी माजविण्या- सारखें आहे.
 कांहीं होवो पण शांतता पाहिजे असें केवळ ह्मणणारा ज मी माणूस नाहीं, तरी होतां होईल तों शांतता राखा असें सां- गणारा मी माणूस आहें, असें कबूल करावयास मला लाज वा- टत नाहीं. जिवाशी येऊन पोहचणारे कांहीं प्रश्न असतात, ते मध्यस्थींच्या कडे सोपवितां येत नाहींत. पण, अर्ल रसेल ह्या गोष्टींत अधिकारी माणूस आहे, तो असें ह्मणतो: - जें शस्त्रांचा उपयोग केल्याशिवाय तडजोडीनें मिटवितां आलें नसतें असें एकही युद्ध गेल्या शंभर वर्षांत झालें नाहीं.
 मॉ० गँबाटाबरोबर नुक्तेच बोलणें झालें, तेव्हां तो नेहमीं- प्रमाणें चेवीस येऊन बोलला:- :- “सध्यांचा खर्च चालू ठेविला तर असा दिवस येईल कीं, जे वेळीं फ्रेंच लोक आपल्या बराकी- पुढें भीक मागत फिरतील." हा खर्च चालू आहे इतकेंच नव्हे, तर तो वाढत चालला आहे.
 यूरोपची स्थिति पाहून भीति वाटल्याशिवाय रहात नाहीं. रशियामध्यें राजघातकी पक्षाचें बंड माजलें आहे; जर्मनींत सो- शालिझम (समाजस्वातंत्र्य) माजला आहे; फ्रान्समध्यें बेबंदशाही लोकांचें भय वाढलें आहे, व राष्ट्र दिवाळें फुंकण्याच्या बेतांत आहे. सध्यांच्या बेबंदशाही लोकांच्या गुन्ह्यांस सबब नाहीं, किंवा ते न्याय्य नाहींत. पण, कारणाशिवाय ह्या जगांत कार्य नाहीं. यूरोपखंडांतले मजूरांस थोड्या वेतनावर फार वेळ काम