पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८

कामाकरितां लाविलीं असती, तर त्यांच्या श्रमाचें उत्पन्न, वर्षास प्रत्येकी ५० पौंड धरल्यास १७ कोटी ५० लक्ष झालें असतें. तें पूर्वीच्या खर्चात मिळविलें तर यूरोपखंडांतील युद्धखात्यां- संबंधीं खर्चाची रक्कम वर्षास ३० कोटी ५० लक्ष होते. नुस्त्या पैशाचा विचार सोडिला तथापि आणखी महत्वाचे गंभीर मुद्दे आहेतच. पण, पैसा माणसाचे श्रम व प्राण मोजण्याचें माप होय. सध्यांच्या आरमाराची व सैन्याची व्यवस्था पाहिली ह्मणजे भावी अनर्थाविषयीं भीति उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाहीं. तिच्यामुळे युद्धप्रसंग आला नाहीं, तरी दिवाळें फुंकण्याचा येईल.
 यूरोपांतील मुख्य मुख्य देश कर्जात अधिकाधिक बुडूं लागले आहेत. गेल्या वीस वर्षांत इतालीचें कर्ज ४८ कोटी ३० लक्ष होतें तें ५१ कोटी ६० लक्षांवर आलें. आस्त्रेलियाचें ३४ कोटी- वरून ५८ कोटींवर आलें. रशियाचें ३४ चें ७५ कोटी झालें. फ्रान्साचें ५० कोटींचें एक अब्ज ३० कोटी. सर्व देशांची कर्जे एक केलीं, तर तीं १८७० त ४ अब्ज होतीं. हैं कर्ज अगणित व भयंकर असून चुरडून टाकणारें आहे. पण, तें आतां किती वा- ढलें आहे! तें ६ अब्ज झालें आहे, व सारखें वाढतच आहे.
 ह्या अगणित छाती दंग करून टाकणाऱ्या ओझ्याचा बराच भाग मोल येणाऱ्या जिनगींत टाकिलेला नाहीं; किंवा उपयो- गाच्या कामी खर्च केलेला नाहीं; तो अगदीं निव्वळ पाण्यांत टाकिलेला आहे. राष्ट्रांच्या दृष्टीनें युद्ध करण्यांत किंवा यु- द्धाची तयारी करण्यांत उधळलेला आहे. वस्तुतः खरी शांतता आपणांस नाहींच, खरोखर सध्यांचा युद्धकालच आहे. लढाया होत नाहींत व रक्तपात होत नाहीं हें केवळ नशीब. पण अत्यंत क्लेश भोगावे लागतात. आपल्या देशाचें उदाहरण घेतलें तरी राष्ट्रीय उत्पन्नाचा एक तृतीयांश पुढील युद्धांची तयारी करण्या-