पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३७

समोरच्या टेकडीवर मीं एक राक्षसी आकृति पाहिली, जवळ येतांच तो माणूस असावासें वाटलें, अगदीं जवळ आल्यावर प्रत्यक्ष आपला भाऊ असें कळलें.

 दुसरीं राष्ट्रें माणसें आहेत इतकेंच नव्हे, तर आपले भाऊ- बंदांपैकीं आहेत, व पुष्कळ रीतीनें त्यांचा व आमचा फायदा एकाच गोष्टींत असतो. त्यांचा तोटा तो आमचा तोटा, त्यांचा नफा, तो आमचा नफा. जगाची आबादानी व शांतता ही ब्रितिश लोकांची आकांक्षा आहे. युद्धानलाच्या तेजानें मनुष्य- जातीचे डोळे दिपून गेले आहेत. युद्धांचें महत्व व बडेजावी ह्यांबद्दल बढाया मारिते वेळीं असें सांगतात कीं, सेनानायकाचें चिन्ह प्रत्येक शिपायाच्या पिशवीत असतें इ० इ०. ह्मणून युद्धां- मुळें मनुष्यजातीवर अगणित दुःखें कोसळलीं आहेत त्यांची कल्पना आपणांस होत नाहीं. युद्धांच्या योगानें जो रक्तपात होतो व जी विपत्ति भोगावी लागते तिची कल्पनाच करितां येत नाहीं. हाच शिष्टाई चांगली असें ह्मणण्यास अपरिहार्य पुरावा. सध्यस्थिति माणुसकीस काळिमा आणणारी आहे. रानटी माणसें आपली भांडणें शस्त्राच्या जोरावर मिटवितात; त्यांस कांहींतरी क्षमा आहे. पण सुधारलेल्या राष्ट्रांनी असें करावें हें आपल्या नैतिक व व्यावहारिक बुद्धीस नापसंत आहे. सध्यां युरोपांत नेहमींची शांतता राखण्यास ३५ लक्ष शिपायी बाळगावे लागतात. लढाईसाठीं राखलेले लोक १ कोटीवर आहेत, व सध्यां घोळत असलेली व्यवस्था झाल्यास ते २ कोटींवर जातील. ठोकळ वार्षिक खर्च २० कोटी पौंडांवर आहे. परंतु, ज्या अर्थी युरोपखंडांतील सैन्यांत कायद्यानें फुकट चाकरी करण्यास लागलेले लोक आहेत, त्या अर्थी खरा खर्च ह्यापेक्षां जास्त धरला पाहिजे. तथापि ३५ लक्ष माणसें जर उपयुक्त