पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६

 हिंदुस्थान आमच्याकडे आहे हें जरी मोठें जोखीम तरी तें एकच जोखीम आमच्यावर आहे असें नव्हे. पृथ्वीवरील इतर मोठमोठ्या राष्ट्रांशी आमचा व्यवहार असतो. मोठमोठे प्रश्न उद्भवतात; व पुढें देखील उद्भवतील. त्या वेळीं दोन्ही पक्षांनी शहाणपणा, नेमस्तपणा, क्षमाशीलपणा इत्यादि बाळगले पाहिजेत. कोणत्या ठिकाणीं पड घ्यावयाची, कोणत्या ठिकाणीं हेका चाल- वावयाचा हे आपल्या मुत्सद्यांस कळलें पाहिजे; व कोणता पक्ष स्वीकारावा हें लोकांस देखील समजलें पाहिजे.
 मोठमोठ्या राष्ट्रांची मालिका धुळीस मिळाली असें मानवी जातीच्या इतिहासावरून कळते. इजिप्त, असीरिया, पर्शिया, रोम हीं वर्चस्वास चढलीं व नाहींतशीं झाली. आजकाल जिनोवा, व व्हेनिस पुष्कळ अंशीं आरमार, वसाहती व व्यापार ह्यांच्या जोरावर भरभराटीस आली. त्याप्रमाणें सध्यां आपलें चाललें आहे. त्यांची जी दशा झाली त्यांतून आपणांस सुटाव- याचें असल्यास त्यांनीं केलेले प्रमाद टाळले पाहिजेत. "राष्ट्रें रचावयास हजार वर्षे पुरत नाहींत, तींच मोडावयास क्षण पुरा होतो. "

 आपल्या बाह्य राज्यधोरणाविषयीं ह्मणाल, तर इतर राष्ट्रांशीं मित्रत्वानें वागणें हें आपलें कर्तव्य आहे इतकेंच नव्हे, तर त्यांत आपला फायदा आहे. दुर्दैवानें राष्ट्रें एकमेकांस शत्रु मानि- तात. तथापि शुद्ध ज्ञानप्रकाशानें असें दर्शविलें जातें कीं, आपण सर्व माणसें आहोंत, तेव्हां आपणांस एकमेकांशी मित्र- भावानें वागलें पाहिजे. एका वेल्श पायानें साध्या पण सहज कळण्याजोग्या रीतीनें हैं तत्व उदाहरण सांगून एकदां सम- जावून दिलें. तो ह्मणालाः - मी एके दिवशीं फिरावयास निघालों;


 १ बायरन.