पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ११.


नागरिक लोकांचे कर्तव्य.

 आपण ह्या देशाच्या राज्यव्यवस्थेतला एक अंश आहोंत; व ही जबाबदारी योग्य रीतीनें बजावण्यासाठी आपल्या अंगीं योग्यता आणणें हें सर्वांत मोठें कर्तव्य होय. ह्यास अभ्यास, मनन, व त्याचप्रमाणें नुस्ती देशकल्याणाची इच्छा इत्यादींची जरूरी आहे. आपल्या राष्ट्राचा अतिविस्तृतपणा हें एक धोक्याचें कारण आहे. मनुष्यांच्या निरनिराळ्या जातींवर आपण राज्य करितों; त्यांपैकीं कांहींचे आचारविचार, हांवी, इत्यादि आपल्या- पेक्षां भिन्न असतात. हिंदुस्थान घ्या ना. तेथील लोकसंख्या इंग्लंदच्या लोकसंख्येपेक्षां दसपट मोठी आहे, व तिचे निरनि- राळ्या जाति व धर्म ह्यामुळें भाग पडले आहेत. खरे हिंदु आपण ज्या जातींतले त्याच जातीचे, ते भाषा बोलतात ती व ..आपली एकाच भाषेपासून निघालेली आणि रचनेनें सारखी आहे. इतकेंच नव्हे, तर दोन्हींत सारखे शब्द अद्यापि सांपडतात. हिंदुस्थानांतील पुष्कळ शहरांच्या नांवाच्या शेवटीं पुर हा शब्द येतो. तो “बरो” शब्दासारखाच आहे. बरो हा शब्द "पुर" शब्दाप्रमाणें आमच्या भाषेंत वारंवार येतो. पण, हिंदू लोक तेथील लोकसंख्येचा एक अंश आहेत; व ते, दक्षिणेकडील द्रविडीयन लोकांपेक्षां पूर्वेकडील मॅलोचायनीज लोकांपेक्षां रक्तमांसानें आह्मांस जवळचे आहेत. कालपरत्वें, व देशपरत्वें, त्यांच्यांत आमच्यांत भिन्नता आली आहे. धर्माच्या बाबतींत त्यांची महमदी धर्माच्या लोकांबरोबर बरीच चुरस आहे. हे लोक राज- कर्ते होते; व आह्मीं हिंदुस्थान सोडिलें तर ते कदाचित् पुनः राजे होतील.