पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४

आपणांस कळलें पाहिजे. " माणसें व त्यांचीं कृत्यें हीं शारीरिक बलानें नियंत्रित होत नाहींत, त्याला नैतिक बल हवें. "
 प्रत्येक मनुष्य आपले कर्तव्य लक्षपूर्वक बजावील असें मान- ण्यास इंग्लंदास अधिकार आहे. आपली जन्मभूमी आपणांस असें ह्मणतेः–“तुझ्याकरितां मीं एवढें करून दिलें. तूं माझ्या- करितां काय केलें आहेस ? " खरोखर गतकालच्या इतिहासाचें सिंहावलोकन केलें, तर आपल्या देशावर जें काम सोपविलें होतें तें त्यानें शहाणपणानें व उदार मनानें बजाविलें; व लढायांत जय मिळवून राज्य सं- पादन केलें, ते जय मिळविण्यांत जितकें वैभव होतें तितक्याच वैभवानें तें राज्य चालविलें, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. इं- ग्रजी भाषा बोलणारांचें एक राष्ट्र होईल असा वेळ कधीं तरी येईल असें मानणें स्वप्नवतच का !

 माझ्या देशाचा मी पक्षपात करितों, व त्याचा मला बराच अभिमान आहे, असें कदाचित् लोकांस वाटेल. पण प्रत्यक्ष गोष्टीं- वरून तें आपोआप बाहेर पडतें. आणखी मॉरिस ह्मणतो: “ ज्या माणसाची प्रीति आपल्या राष्ट्रावर अतिशय असते, त्या माणसाचे इतर राष्ट्रांविषयींचे विचार बहुतेक न्यायाचे असतात. " स्व- देशभक्तीच्या योगें पौरजनांच्या कर्तव्यांबद्दलची आपली कल्पना विस्तृत होते, व स्वार्थ व स्वकुटुंबहित इत्यादि क्षुल्लक गोष्टीं- पलीकडे जाऊन, राष्ट्रजीवनाची खरी महती व वैभव हीं आप- णांस कळतात. राष्ट्र महतीचें खरें वारें वृथा डामडौलाचें नव्हे. आपली भाषा तीतले ग्रंथ ह्यांचा प्रसार करण्यांत, आपले लोक च आपला व्यापार देशोदेशीं व समुद्रांसमुद्रांतून वाढविण्यांत, अभिमान बाळगणें, व आपल्यावर आलेली जी ही जबाबदारी ती ओळखणें, हें खरें राष्ट्रमहतीचें वारें.


 १ कार्लाइल.