पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३३

रांनी आपापली मतें दिलीं; व पहिल्या आठ पुस्तकांत बायबल खेरीज करून चार पुस्तकें इंग्रजी भाषेतली होती.
 जुन्या व नव्या शोधांसंबंधीच्या इतिहासांत वाफेच्या यंत्रां- विषयीं बोलते वेळीं वॉट साहेबाचें नांव यावयाचें. त्याचप्रमाणें वाफेच्या एन्जिनसंबंधानें स्टीफन्सचें, विजेच्या तारायंत्रासंबंधानें व्हेटस्टोनचें, कांतण्याच्या यंत्रांसंबंधानें आर्क राईटचें, जेनीसंबंधानें हारग्रीव्हचें, फोटोग्राफीसंबंधानें फॉक्स टालबटचें नांव यावयाचेंच.
 वैद्यशास्त्रांत रक्तप्रसरण हार्वेंनें शोधून काढिलें; देवी टोंच- याचें जेनरनें, बेशुद्ध करण्याचें सिम्पसननें, जखमा झाल्या असतां अथवा शस्त्रक्रिया करते वेळीं रक्त दूषित होणें बंद करण्याचें लिस्टरने शोधून काढिलें. शास्त्रांत प्रवीण अशीं मोठीं माणसें आमच्यांत पुष्कळ आहेत:- बेकन, न्यूटन, यंग, डार्विन, डेव्ही, डाल्टन, कॅव्हेन्डीश, फॅरडे, हर्शल, वुइल्यम, स्मिथ, लायल, मर्चिसन, इत्यादि, इत्यादि.
 ह्या गोष्टी स्वतःचा बडेजाव ह्मणून सांगत नाहीं तर त्या आपल्या वडिलांस भूषणास्पद आहेत ह्मणून सांगतों. आपणांस त्यांबद्दल अभिमान आहे, पण, त्यांमुळें आपणांवर एक जबा - बदारी येते.
 मग आपणां सर्वांस मिल्टनसारखी ईश्वराची प्रार्थना कर- ण्यास हरकत नाहीं. “हे ईश्वरा, ज्या त्वां आपल्या खुशीनें च दयेनें बाजूंच्या बेटांसहित हें त्रितिश सार्वभौम राष्ट्र रचिलें, च वैभवाच्या ह्या अत्युच्च स्थितीस आणिलें, त्या त्वां ह्या सुखाच्या वेळीं आमच्या ठायींच रहावें." पण, हा वर द्यावा अशी ईश्वराची प्रार्थना करून स्वस्थ बसतां कामा नये; तो वर मिळविण्याची योग्यता आपल्या अंगीं आणिली पाहिजे. अति- -शय जोमाचा वेग ह्मणजे बाहेरून शांत दिसणारा असतो हैं
 १२