पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२

मद्यांवरील जकात शेंकडा ९२ ह्याप्रमाणे इंग्लंद देतें, व आय- द फक्त शेंकडा ह्याप्रमाणें देतें. आयर्लेदाबरोबर न्यायाचें व वाजवी उदारपणाचें वर्तन असावें असें प्रत्येक इंग्रज व स्कॉच माणसास वाटतें.
 लढाई करून जसे जय मिळतात तसेच शांततेचेही जय असतात, हें आपणांस माहीत आहे; व मनुष्यजातीच्या उत्क्र- मणइतिहासाकडे लक्ष फेंकलें तर आमच्या वाडवडिलांबद्दल देखील अभिमान बाळगण्यास आह्मांला पुरेशी जागा आहे. इंग्रजी भाषेचा झपाट्यानें प्रसार होत चालला आहे, व ती मनुष्यजातीची सर्वसाधारण भाषा होईल अशी सबळ आशा आहे. तरी बेकननें “ज्ञानप्रसार" नांवाचें आपलें पुस्तक लॅतिन भाषेत लिहिण्यास डॉ० प्लेफेअरला सांगितल्याला फारसे दिवस झालेले नाहींत. त्याचें कारण त्यानें असें दिलें होतें:- “ज्या भाषेत तें लिहिलें आहे ती भाषा फारशी माहितींतली नसल्या- मुळे वाचकांची संख्या नियमित होते, व त्याचेंच भाषांतर लॅतिनमध्यें झालें ह्मणजे पुस्तकाचा पुनर्जन्म झाल्यासारखे होईल.”
 आपल्या देशापेक्षां जास्त शुद्ध, जास्त जोरदार, व जास्त उदात्त ग्रंथसमूह आहे असा अभिमान कोणत्याही देशास बाळगितां येणार नाहीं. मी इंग्रज आहें तेव्हां हा माझा स्वाभि- मान असें कदाचित् ह्मणतां येईल. पण, सर्वांच्या मतें लेखकस- मुदायांत शेक्सपीयर अनुपम वरिष्ठ होऊन गेला. आजका- लचे ग्रंथकार जरी सोडून दिले तरी चॉसर, बेकन, मिल्टन, स्पेन्सर हे आपल्या देशास वैभव आणणारे होत. नुक्तेच एका प्रसिद्ध इताली देशांतील पत्रानें जगांतील उत्तम पुस्तकांबद्दल मतें गोळा केलीं होतीं. पुष्कळ लोकांनीं, ह्मणजे शेंकडों वर्गणीदा-