पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३१

करण्याचा महोत्सव तें राष्ट्र करितें. सीमेच्या दुसऱ्या बाजूस तेच अँग्लो सॅक्सन व इन्दियन लोक रहातात. त्यांनीं इन्दियनां- चरोबर लढाई करण्यांत एक डॉलर खर्चिला नाहीं. इन्दियन लोकांची कधीं कत्तल केली नाहीं. आणि असें कां ? कॅनडा- मध्यें इन्दियन लोकांबरोबर झालेल्या तहांत त्या लोकांस राणीची इन्दियन प्रजा असें ह्यटलें आहे. सुधारणा त्यांच्या जवळ येऊ लागली ह्मणजे बरेच प्रतिबंध त्यांच्यावर ठेवितात. सुधारणा करण्याच्या कामी त्यांना मदत करितात. त्यांना स्था- वर मिळकत मिळविण्याचा अधिकार असतो. त्यांना तेच कायदें लागू असतात; व कायद्यांचें त्यांना रक्षण मिळते; त्यांच्या साठीं शाळा असतात, व ख्रिस्ती लोक त्यांच्याकरितां उत्तम शिक्षक पाठवितात. "
 आह्मीं आयर्लेदाचें नुकसान केलें असें कधीं कधीं ह्मणतात. पण हैं बोलणें अगदीं अन्यायाचें आहे. उलट पक्षीं लोकसं- ख्येच्या मानानें व वसुलाच्या मानानें वाजवीपेक्षां जास्त मुखत्यार त्यांना पाठवितां येतात. आमचे जे कर आहेत तेच त्यांचे आहेत. ह्याशिवाय आयर्लेदाला द्यावे लागत नाहींत, पण आमाला द्यावे लागतात ते कर असे: -- जमिनीचा धारा, घरपट्टी, रेल्वे- पट्टी, जमाबंदी; एकूण सालिना ७ लक्ष पौंड, व शिवाय किरकोळ पट्ट्या. ह्या वर्षापर्यंत आयर्लंदच्या शेतकऱ्यांस आमच्या येथल्या पेक्षां कमी इन्कमटॅक्स द्यावा लागत होता. आकारणी करिते वेळीं इंग्लंदाच्या जमिनीपेक्षां आयर्लंदच्या जमिनीची आकारणी कमी धरितात; व त्याला नेहमी मोठ्या देणग्या मिळतात; उदाहरणार्थ दुष्काळाच्या वेळीं त्याला ८० लक्ष पौंड मिळाले. मद्यार्कावरची ज़कात आयर्लंदला फाजील देणें पडते असें कधीं कधीं ह्मणतात. पण, बीर दारूवरली जकात बहुतेक इंग्लंदांत भरतात. इतर