पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०


झाली आहे. त्रितिश राज्यांत जुलुमाचे कर द्यावे लागणार नाहींत, न्यायी कायद्यांच्या अंमलांत राहावयास सांपडेल, फा- यदेशीर व तेजीस येणारा व्यापार करावयास मिळेल, हें जाणून चिनी लोक खाडी ओलांडून येथे रहाण्यास आले आहेत. तसेंच सिंगापूर ह्या बहुतेक निर्जन स्थळीं चीन, मॅलेद्वीपकल्प व हिंदुस्थान इत्यादि देशांतून त्याच कारणांस्तव आलेले असंख्य लोक सांपडतात.
 जावा हैं एक आणखी उदाहरण घ्या. हीरन ह्मणतोः -- “तें पांच वर्षे ब्रितिश अंमलाखालीं होतें; तितक्यांत त्यांचा अंमल इतका नेमस्त व सौम्यपणाचा होता कीं, तें डच लोकांस परत दिल्यावर तद्देशीय व युरोपियन लोकांस त्यांच्या अंमलाखालीं रहाणें जड पडूं लागलें. ब्रितिश लोकांच्या अंमलांत तें थोडा वेळ होतें, तितक्यांत ह्या प्रसिद्ध बेटांत तेजस्वीतर ज्ञानप्रकाश पडला, तसा तें हालंदच्या ताब्यांत असतांना संबंध २०० वर्षांत पडला नव्हता."
 अमेरिकेकडे वळून मिनेसोटाचा अमेरिकन बिशप व्हिपल ह्याच्या जोरदार पुराव्याचा मी उतारा देतों. तो संयुक्त संस्थानें व तत्रितन ह्यांच्या आपापल्या देशांतील इंन्दियनांबरोबरच्या संबंधांची पुढे लिहिल्याप्रमाणें तुलना करितोः- “सीमेच्या एका बाजूस एक राष्ट्र आहे; त्यानें इन्दियनांबरोबर लढाई करण्यांत ५० कोटी डॉलर्स खर्च केले. अॅलॉन्तिक व पॅसि- फिक महासागरांमध्ये असलेल्या १०० मैल लांबीच्या, ह्या राष्ट्रा- च्या अंमलाखालील प्रदेशांत अशी एकही जागा राहिली नाहीं कीं, ज्या ठिकाणीं इन्दियन लोकांची कत्तल झाली नाहीं. इन्दि- यन लोकांच्या एकाही जातीला त्यांनीं ख्रिस्ती सुधारणा दिली नाहीं. प्रत्येक शतकाच्या शेवटास इन्दियन लोकांबरोबर लढाई