पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२९

आणि त्या आणीबाणीच्या प्रसंगी त्यांनी जें वर्तन केलें त्यावरून, आपणांवर जें काम विश्वासिलें होतें तें काम आपण कशा रीतीनें बजाविलें, ह्याबद्दल उत्तम साक्ष मिळते.
 "बंडाच्या वेळीं कप्तान डी स्टुबर्टनें घोड्यावरून आग्रा- पासून दिल्लीपर्यंत मोठ्या धाडसाचा प्रवास केला. ते वेळीं आ- पलें राज्य गेलें असें समजून पुढें येणारी संकटें व झोटिंग पाद- शाही ह्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशानें तद्देशीय लोक गांवांभोंवतीं तटबंदी करीत होते असें त्याला दिसलें."
 म० थियर्सच्या कारकीर्दीतील माजी फॉरिन सेक्रेटरी बार्थे- लेमी सेंट हिलेर हा मोठा माणूस होता. त्यानें हिंदुस्थानांतील ब्रितिश अंमलाच्या उदारपणाबद्दल व न्यायीपणाबद्दल मोठ्या मनानें उल्लेख केला आहे. “मनुष्यमात्राचे व सुधारणेचे हित- चिंतक असल्या गोष्टींत जेवढे यश यावें असें समजतात तेवढें यश त्यांना आलें आहे.२५ कोटी लोक जे त्यांचे देशबांधव त्यांना राष्ट्रीय व नैतिक शिक्षण देण्याच्या कामांत त्यांस अतिशय यश आलें आहे; त्या शतकांत आरंभ केलेल्या ह्या उदार प्रयत्नास पूर्ण यश येण्यास फार मेहनत करावी लागेल." तो ह्मणतो त्याप्रमाणे मोठे कठीण काम आपणांपुढें आहे; पण, निःपक्षपाती उत्तेजन देणाऱ्या सर्व लोकांकडून आपली मनापासून प्रशंसा होईल हे पाहून समाधान वाटतें.

 आपल्या राज्यव्यवस्थेबद्दल इतर लोकांनीं जें मत ठरविलें आहे, तें हाँगकाँग व सिंगापूर ह्या ठाण्यांच्या इतिहासावरून स्पष्ट होतें. मि० वुड ह्मणतो- “पहिलें ठाणें पूर्वी एक ओसाड बेट होतें. त्रितिश लोकांस तें मिळालें तेव्हां तेथें मूठभर कोळी लोकांची वस्ती होती. तेथें आतां हजारों चिनी लोकांची गर्दी


 १ राबर्टनें हिंदुस्थानांत काढलेली ४१ वर्षे.