पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८

 हिंदुस्थानचें राज्य तेथल्या लोकांस फायदेशीर होईल अशा रीतीनें चालवावयाचें ही आमची मनापासून इच्छा आहे, व तसा आमचा यत्नही असतो. राज्य चालवितांना आमच्या येथे जशा चुक्या झाल्या तशा तेथेंही झाल्या असतील. पण, वरील धोरणांनी आह्मीं राज्य चालविलें आहे.
 आमच्या अंमलामुळे त्यांचा फायदा झाला हें खोटें ह्मणतां येणार नाहीं. डॉ० हन्टर असें सांगतो-ओढ्या प्रांतांत उत्पन्ना- पैकीं शेंकडा ६० राजअंश असे. अगदीं प्रजेस अनुकूळ असें तद्देशीय सरकार शेंकडा ३३ टक्के सारा कापून घेत होतें; आ- पलें सरकार शेंकडा ३ किंवा ७ घेतें. तद्देशीय राजांच्या अंग- लाखालीं असतांना जें सरकारदेणें होतें त्यापेक्षां सध्यां हिंदुस्था- नांतील आपल्या देशबांधवांचें सरकारदेणें कमी आहे, व त्यांचें जीवित आणि मालमत्ता जास्त सुरक्षित आहे. निदान इंग्लंदच्या वसुलाकरितां हिंदुस्थान एक पैही देत नाहीं हैं खास. हिंदु- स्थानचे लोक आपणावर प्रीति करितात असें कदाचित् ह्मणतां येणार नाहीं; व तसें होईलसें वाटणेंही कदाचित् अशक्य आहे. पण, ते आपल्या राज्याला मान देतात हें खोटें ह्मणतां येणार नाहीं.
 आपलें राज्य लोकांस आवडत नाहीं असें नाहीं, हें शिपा- यांच्या बंडाच्या वेळीं स्पष्ट दिसून आलें. वरच्या दर्ज्यापासून तों खालच्या दर्ज्यापर्यंतच्या साऱ्या लोकांनीं वीरांसारखें वर्तन केलें, व आपलें राज्य अन्याय व दोष ह्यांनीं दूषित झालेलें असतें, किंवा साधारणपणें आपणांवर विश्वास नसता किंवा हिंदुप्रजा आपणांस मान देत नसती, तर आपण केव्हांच समुद्रांत बुडून गेलों असतों. आपल्या शूर शिपायांचा पराक्रम, त्यांच्या नाय- कांचें युद्धकौशल्य ह्यांचा अशा वेळीं फारसा उपयोग झाला नसता. हिंदुस्थानच्या प्रजेनें आमच्या विरुद्ध उघड शस्त्र उचलिलें नाहीं;