पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२७

कोटी रुपये देतात. वसाहती व हिंदुस्थान येथील ३० कोटी प्रजा बहुतेक कांहींच देत नाहीं.
 पुनः एकवार हिंदुस्थानचें उदाहरण घ्या. राष्ट्राच्या साधारण खर्चास हिंदुस्थान प्रत्यक्ष रीतीनें कांहींच पैसा देत नाहीं हें सांगण्याची फारशी जरूरी नाहीं; त्याचप्रमाणें ज्या खर्चामुळे वसा- हतींसारखा हिंदुस्थानचा नफा होतो, त्या खर्चातला आपला भाग तो देत नाहीं. हिंदुस्थान आपल्या ताब्यांत आहे ह्मणून इंग्रज मजूरांस किंवा पट्टी भरणाऱ्यांस एक पैचा प्रत्यक्ष फायदा नाहीं, किंवा देशाच्या वसुलांत त्यांची एक पै कमी होत नाहीं.

 लष्करच्या खर्चासंबंधी देखील जेवढें लष्कर प्रत्यक्ष कामावर असेल त्यांच्या पगारास पुरेल त्यापेक्षां एक पैही हिंदुस्थानास जास्त द्यावी लागत नाहीं, अशी मोठी खबरदारी ठेविली आहे. इतक्या महत्वाच्या विषयांत देखील आश्चर्यास जागा आहे असें मानिलें, तर पुढील गोष्ट आश्चर्यकारक होय. युद्धखात्यानें आ- पल्या खर्चाच्या भागाबद्दल मागण्या केल्या ह्मणजे हिंदुस्थान- सरकार, जरूर दिला पाहिजे तेवढा पैसा शिवाय करून बा- कीच्या सर्व मागण्यांचा मोठ्या जोमानें प्रतिकार करितें.

 आरमारासंबंधानें देखील हिंदुस्थानाला अतिशय उदारप- णानें वागवितात. आमच्या आरमारापासून त्याचा फार फायदा होतो ह्याबद्दल संशय काढावयास नको. जो खर्च त्याला जरूर करावा लागता असा जबर खर्च त्याचा वांचतो. तथापि आर- माराच्या खर्चासाठीं तो सालिना ७०००० पौंड देतो; व ह्या- शिवाय आगबोटी, नद्यांतून खाड्यांतून चालणाऱ्या बोटी, वाटा- ड्यांचा खर्च, बंदराचा खर्च इत्यादींसाठीं आणखी ५ लक्ष पौंड खर्चितो.