पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६

जास्त असला पाहिजे. कारण, दिलेल्या आंकड्यांत, हत्यारें, दारूगोळा, शिपायांच्या बराकी, दवाखाने इतर सरंजाम ह्यांच्या- साठीं झालेला खर्च, नवीन शिपाई चाकरीस ठेवण्यास, मुख्य हपीस चालविण्यास झालेला खर्च घातला नाहीं.
 भूमध्यसमुद्रांत आरमार ठेवण्यास लागणारा खर्च वसाह तींचा असें क्वचितच ह्मणतां येईल, असा कोणी आक्षेप काढील; व त्याचप्रमाणें माल्ता व जिब्राल्तर ह्या ठाण्यांस लागणारा खर्च त्यांना स्वतःकरितां येईल, असें आपणांस ह्मणतां येत नाहीं. पण, तीं ठाणीं ठेवण्यास मोठें कारण ह्मणजे, हिंदुस्थान व आ- स्त्रेलिया ह्या देशांशी असणारें दळणवळण कायम राखण्याची जरूरी हैं होय; हें दळणवळण कायम ठेवण्यास लागणारा खर्च आमच्याच डोकीवर कां पडावा, त्यांतला थोडा भाग हिंदुस्थान व आस्त्रेलियांतील वसाहती ह्यांनीं कां देऊ नये, असें आपणांस देखील विचारितां येईल. आणखी, वर सांगितलेला खर्च, मा- तृदेशभूमीच्या बाहेर सैन्यास चाकरी करावी लागते ह्मणून होतो तोच होय. पण, इंग्लंदांतलें सैन्य गरजेपुतें ठेऊन, व- साहतींच्या कामांस लावितां येईल, ह्मणून नेहमींच्या ह्या खर्चाचा थोडा भाग त्यांनी द्यावा असें वाटणें न्यायाचें होईल.
 आपल्या राष्ट्राच्या जमाखर्चात वसाहतींकरितां आरमाराचा खर्च त्यांच्या नांवें मांडलेला नसतो; तथापि, वस्तुतः वसाहती स्वतंत्र असत्या तर जो आरमाराचा खर्च त्यांच्यावर पडला अ- सता तो खर्च आपला देश करितो. त्यांच्या करितां समुद्रांत पोलिसचें काम आह्मी करितों. नीचें आह्मी संरक्षण करितों. समजण्यास फारसा विचार नको. देशांतील ३ कोटी ५० लक्ष प्रजा त्यांच्या किनाऱ्याजवळील जमि- त्यांचा खर्च किती वांचतो हैं ग्रेतत्रितन व आयर्लेद ह्या आरमाराच्या खर्चाकरितां २