पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२५

रखी आमची आबादानी नव्हती अशा वेळीं ५० वर्षेपर्यंत आ- फ्रिकेच्या किनाऱ्यावर पदरच्या खर्चानें आह्मीं आरमार ठेविलें, व त्या कामांत पुष्कळ मोठ्या लोकांचे बळी दिले. ग्लॅडस्टन साहेब खजीनदार असतांना त्यांनीं ह्या आरमाराच्या खर्चाचा वार्षिक आंकडा ७ लक्ष पौंड केला होता. वेस्ट इंदीज व मॉ- रिशस ह्या बेटांनीं गुलामांस बंधमुक्त करावें ह्मणून त्यांस २ कोटी पौंड दिले. ह्या नीच व्यापाराचा बीमोड करण्याच्या उदार प्रय- नामुळें राष्ट्राला जवळ जवळ १० कोटी पौंड खर्च आला.
 इतर राष्ट्रें वसाहतींपासून व आश्रित राष्ट्रांपासून बराच वसूल मिळवितात. अथेन्स आपल्या सख्यसंबद्ध राष्ट्रांपासून दर वर्षी बराच मोठा खंड घेत असे, व राष्ट्रीय वसुलाचा तो बराच मोठा भाग होता. प्रांतांनीं राज्याचा खर्च पुरवावा हैं। रोमन लोकांचें कराचें मुख्य तत्व होतें. त्यांनीं सिसिली बेट घेतलें, तेव्हां शेतीच्या उत्पन्नाचा देशांत येणाऱ्या व देशां- तून जाणाऱ्या मालावर ५ टक्के जकात ते घेऊं लागले. अली- कडच्या काळीं, इतर देश-स्पेन, पोर्तुगाल, हालंद-यांनीं वसा- हतींपासून बराच वसूल मिळविला आहे.
 इंग्लंदचें वर्तन अगदीं भिन्न झालें आहे. वसाहतींकडून कर घेण्याच्या ऐवजीं उलट त्यांच्या सुखाकरितां इंग्लंदानें हजारों रुपये खर्च केले आहेत. १८५९ च्या पूर्वी वसाहतींकरितां इंग्लंदानें किती रुपये खर्चिले हैं दाखविणारे आंकडे छापून घालेले नाहींत, असें मला मिळालेल्या माहितीवरून वाटतें. पण, १८५९ ते १८६९ पर्यंत खर्च ४ कोटी १० लक्ष पौंडांवर गेला. व त्याच्यापूर्वी बरीच वर्षे सालिना खर्च ४ लक्षांवर झाला असला पाहिजे.
 मातृदेशभूमि जी इंग्लंद तिला झालेला खर्च ह्यापेक्षां बराच