पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४

युद्धे सोडिलीं, तर इतक्या कालाच्या इतिहासाच्या मानाने का- ळिमा आणण्याजोगीं आमच्या देशांत जितकीं थोडीं कृत्यें घ- डली आहेत, तितकीं दुसऱ्या कोणत्याही देशांत घडली नसतील. आमच्या येथें फ्रान्सप्रमाणें सार्वजनिक कत्तल किंवा भीतीचें साम्राज्य झालें नाहीं; सिसिली बेटाप्रमाणें रात्रीच्या प्रार्थना झाल्या नाहींत.
 युद्धाच्या वेळीं प्रतिपक्षांवर आह्मीं औदार्य प्रकट केलें आहे. नेपोलियनाबरोबर चाललेल्या झटापटीचा अंत झाला, व फ्रान्सचें सामर्थ्य नष्ट झालें त्या वेळीं, व कटांतील मंडळींनी पॅरिस हस्त- गत करून घेतलें त्या वेळीं, ज्या अटींच्या योगानें फ्रान्सचा मु- लुख व वसाहती अलग त्यांच्याकडे राहिल्या अशा अटींस आह्मी कबूल झालों; व त्यांनीं गुलामांचा व्यापार बंद करावा अशी एकच अट त्यांच्याकडून करून घेतली; आणि फ्रान्सास कर्जमुक्त केलें; ह्याच वेळीं आपण स्वतःच्या खर्चाकरितां ९० लक्ष पौंडांवर कर्ज काढिलें. ह्या अटींचें निरीक्षण करूं लागलों, ह्म- णजे आमच्या मुत्सद्यांनी इतकें औदार्य दाखविलें हा शहाण- पणा केला कीं काय, ह्याबद्दल संशय उत्पन्न होतो. वाटर्लूच्या लढाईत आमचा जय झाला असें फ्रेंच लोक ह्मणतात; ह्याचें आश्चर्य वाटावयास नको. निदान तहाचीं कलमें आमच्यापेक्षां त्यांना जास्त हितावह होतीं हें खरें.
 फ्रेंच लोकांच्या वसाहती त्यांस परत दिल्या हें नुक्तेच सां- गितलें; व गुलामांचा व्यापार बंद करण्यास जे प्रयास पडले व पदरास जो खार लावून घ्यावा लागला, त्याचा हा एक भाग होय. गुलामांचा व्यापार बंद करण्यास आह्मी पोर्तुगाल देशास ३ लक्ष पौंड व स्पेन देशास ४ लक्ष पौंड दिले. ज्या वेळीं मान मोडण्याजोगें कर्जाचें ओझें आह्मांवर होतें, व सध्यांसा-