पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३

सीमा अस्तास जाणारा सूर्य. त्रितिश राज्यांत सूर्य कधीं मा- वळत नाहीं असें बोलणें विशेष सयुक्तिक होय.
 ब्रितानियेला तटबंदी नको, किंवा कड्यावर बांधलेले किल्ले नकोत तिचा मार्ग पर्वतप्राय लाटांवरून असतो, व तिचें घर अगाध समुद्र होय.
 एका अमेरिकन मुत्सद्याचे पुढील शब्द आहेतः -- “तिचें निशाण समुद्रासमुद्रांतून बंदराबंदरांतून फडकत आहे; व तिच्या शिपायांचा उत्थानकालचा दुंदुभिनाद सूर्याच्या गतीस अनुसरून प्रत्येक तासास इंग्लंदाच्या रणगायनास ताल देत सर्व पृथ्वीभर फिरत असतो."
 आपले शिपाई सर्वत्र पसरलेले आहेत; पण, शत्रु ह्या नात्यानें नव्हत तर मित्र व संरक्षक ह्या नात्यानें पसरलेले आ- हेत, हें पाहून आपणांस अधिक आनंद वाटावा. आपल्या स्वयंसेवक शिपायांचा मुद्रणलेख “स्वसंरक्षणार्थ, अहंकारार्थ नव्हे," हा आपल्या सैन्यास व आरमारासही शोभेल.
 हें मोठें राष्ट्र पायरीपायरीनें वाढत गेलें तें आपल्या पूर्व- जांच्या उद्योगामुळें व परिश्रमामुळें लब्ध झालें; व कांहीं होवो आपणांकडे जसें आलें तसें, 'कदाचित् जास्त सुधारून व बळ- कट करून, वंशजांकरितां ठेऊ अशी इच्छा जर आपल्या मनांत वागत नसली तर आह्मी कमकुवत झालों आहोंत, असें ह्यटलें पाहिजे.

 गतकालच्या आपल्या इतिहासांत खेद मानण्याजोग्या ब- याच गोष्टी घडल्या आहेत. पण, इतर राष्ट्रांच्या इतिहासा - बरोबर आपल्या देशाचा इतिहास ताडून पाहिल्यास, आपल्या देशांत रक्तपात फार थोडा झाला आहे असें दिसून येतें. प्रत्यक्ष


 १ कॅम्पबेल.