पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १०.


स्वदेशाभिमान.

 ज्या देशाची मोठ्या अभिमानानें सेवा करण्यास तयार अ- सावें असा देश लटला ह्मणजे आपला होय.
 अरे इंग्लदा ! मूर्ति लहान पण कीर्ति मोठी ह्याप्रमाणें तुझी स्थिति; तुझें बाह्यस्वरूप तुझ्या अंतस्थ मोठेपणाचें दर्शक होय.
आकृतीच्या मानानें दर्या में खसखस तरी अफाट समु- द्रांतल्या अर्ध्या गलबतांवर तुझें निशाण फडकतें.
 भूगोलाच्या मानानें देशाची अवस्थिति फायदेशीर आहे. हवा प्रकृतीस मानणारी व अंगांत कुवत आणणारी आहे. व रुप्यासारख्या चकाकणाऱ्या समुद्राच्या पट्टीनें आपणांस पुष्कळ युद्धांतून वांचविलें आहे.
 "हें सार्वभौम बेट, ही भव्य पृथ्वी, हें मंगळाचें आदिस्थान, हें दुसरें नंदनवन, हें अर्धस्वर्ग, युद्धप्रलयाचा हात लागून दूषित होऊं नये ह्मणून सृष्टीनें आपणांकरितां बांधलेला हा बळकट किल्ला होय. ही सुखी मनुष्यजाति, हें लहानसें जग, रौप्य समुद्राच्या कोंदणांत बसविलेलें हें रत्न आहे; व हा समुद्र तटाप्रमाणें आहे. जसा घराभोंवतीं चर, त्याप्रमाणें कमी सुखी राष्ट्रांच्या द्वेषापासून संरक्षण होण्यास हा समुद्र. "

 संयुक्त संस्थानांतील एक वक्ता आपल्या देशाचें असें वर्णन करितोः- आमच्या देशाची दक्षिण सीमा विषुववृत्त, उत्तर सीमा ॲरोरा बोरिआलिस, पूर्व सीमा अतलतिक महासागर, व पश्चिम


 १ शेक्सपीयर.