पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठेंच मनोरंजक काम करावयाचें आहे असें दाखवितां येईल. टॉमस ब्राऊनचे आयुष्यांत फारशा घडामोडी, किंवा संताप करणाऱ्या गोष्टी घडल्या नव्हत्या. त्याचें आयुष्य बहुतेक संथपणांत गेलें होतें. तरी पण आपल्या आयुष्यक्रमाचें पुढें लिहिल्याप्रमाणें तो वर्णन करितो -" माझें तीस वर्षांचें आयुष्य ह्मणजे एक चमत्कार होऊन गेला. तो जर सांगूं लागलों तर तें चरित्र असें वाटणार नाहीं तर एकादें काव्य आहे, अथवा ए- कादी कल्पित गोष्ट आहे असें वाटेल. "

 रेहॉबोअमचे काळापासून तों लॉर्ड चेस्टरफील्डच्या काळापर्यंत लोकांना उपदेश करण्याचें काम ह्मणजे शिव्या खाण्याचें होय. न्यूझीलंडमधील बाट्यावर जो वाईट प्रसंग गुदरला तो मी विसरलों नाहीं. त्याच्या विषयीं त्या लोकांच्या राजानें एका पाद्याला असें सांगितलें, “तो आह्मांला इतका उपदेश करूं लागला कीं, आह्मीं त्याला शेवटीं ठार मारिलें.” “जे लोक पहिल्यानें बया बोलानें फुकाचा उपदेश घेत नाहींत त्यांना शेवटीं पश्चात्ताप फार महाग घ्यावा लागतो" हें खरें आहे, ह्मणून ज्यांना स्वतःच्या जन्माचें सार्थक्य करावयाचें असेल व आपली उन्नति करावयाची असेल किंवा ज्यांना नांवारूपास यावयाचें असेल त्यांना त्यांच्या हितास्तव कांहीं सूचना करणें हा माझा मुख्य उद्देश आहे.

 मनुष्यें योग्य संधि कशी फुकट घालवितात, हें पाहून खरो-खरी वाईट वाटतें. ईश्वरानें दयेनें दिलेल्या देणग्या बेपरवाईनें फुकट घालवितात. त्या न घालविल्या तर किती लोक सुखी होतील! तुह्मी जीं सुखें ह्मणून मानितां तीं परिणामीं खरीं सुख- कारक आहेत, व काल्पनिक नाहींत हें ठरविण्याची खबरदारी घ्यावी. आपण पुष्कळ गोष्टी, सुखें मानिलेलीं आहेत, ह्मणून करितों, परंतु त्यांनांच जर दुसरीं नांवें दिलीं असतीं तर आपण