पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या पदरीं. “ ज्या स्थितीस आपण येऊन पोहचावें अशी आपली इच्छा असते त्या स्थितीस आपण येऊन पोहचतों. कारण आपल्या संकल्पशक्तीचें सामर्थ्य इतकें विलक्षण आहे कीं तिच्या जोरावर ईश्वर अनुकूल असल्यास ज्या स्थितीस येऊन पोंहचावें असें आपणांस मनापासून वाटतें त्या स्थितीस आपणांस पोहचतां येतें. ”

 आपल्या दैवावर जर आपला इतका दाब आहे, तर आपणांस ह्या जगांत येऊन करावयाचें काय, त्याचप्रमाणें ह्या आयुष्यरूपी देणगीचा सदुपयोग करावा कसा हे प्रश्न मनाला विचारणें महत्वाचें ठरतें. कांहीं मनुष्यांस ह्या जगांत एक नेमका हेतु साध्य करावयाचा असतो व कांहींना नसतो. आपल्या हातून होण्याजोगतें असेल तेवढें करणें व साध्य असेल तितकी स्वतःची उन्नति करणें हा आपला मुख्य हेतु असला पाहिजे.

 हम्बोल्ट ह्मणतो- -" वाढीच्या मानानें संगतवार अशा प्रका- रचें वळण देऊन सर्व शक्ती पूर्णपणें विकसित करणें हें आपलें मुख्य काम असले पाहिजे. " अथवा पॉल जीन रिक्टर ह्मणतो त्याप्रमाणे, “आपल्या अंगीं जी करामत असेल ती बाहेर व्यक्त होईल असा आपण यत्न करावा. मात्र हें केवळ स्वार्थबुद्धीनें करण्याचा यत्न करूं नये. नाहीं तर अपयश यावयाचेंच. बेकन ह्मणतो - " स्वार्थबुद्धीनें दौलत मिळविणें हें ह्या जगांत जन्म घेऊन करण्याचें योग्य काम नव्हे. प्लेतो, ॲरिस्तॉतल, बुद्ध, सेंट पॉल इत्यादि मोठ्या मनाच्या माणसांचें स्वार्थबुद्धीनें स्वतःला पूर्णतेस आणण्यांत समाधान झालें नसतें.

 तर मग परार्थबुद्धीनें स्वतःची सुधारणा केली पाहिजे असें आपण धरून चालूं. हें जर धरून चाललों तर आपणांस


१. जीन पॉल रिक्टर.