पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२१

छावणीतले लोक मनोराज्यांत नेलबरोबर इंग्लंडांतील कुरणां- तून भटकूं लागले, व त्यांचा रस्ता चुकला. "
 इंग्रजी भाषेंतला ग्रंथसमूह इंग्रज जातीची वंशपरंपरेनें आ- लेली जिनगी होय. आमच्यांत श्रेष्ठ कवि, तत्ववेत्ते व शास्त्रज्ञ निपजले व निपजत आहेत. आमच्या व्यापारापेक्षां आह्मांस अ- धिक मौल्यवान्, व शस्त्रांपेक्षां अधिक बलवान् वाटणारा, अ- धिक शुद्ध, सतेज, व उदात्त असा ग्रंथसमूह दुसऱ्या कोण- त्याही जातीजवळ नसेल. त्यांत आपल्या देशाचें खरें वैभव आहे. त्याबद्दल आपणांस अभिमान असला पाहिजे, व त्याबद्दल जितकें आभारी असावें तितकें थोडेंच. ११