पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०

 चांगलें व मनोरंजक पुस्तक वाचून माणसाला सुख झालें नाहीं, व जास्त ज्ञान मिळालें नाहीं असें होणार नाहीं. हें सुख क्षणभरच होतें असें नाहीं. त्याचें स्मरण जवळ रहातें; व एक उत्तम व सुखकारक विचारांचें भांडारच आपल्या जवळ रहातें; आणि तें वाटेल तेव्हां पुनः डोळ्यांपुढें आणितां येतें.
 रक्तमांसानें एक पण अधिक योग्यतेच्या लोकांच्या वायुमय आकृति तरी आपल्यापुढें अवतरतात. जेवतेवेळीं किंवा निजते- वेळीं, प्रसन्न मुद्रेनें पाहून व हितकर उपदेश देऊन त्या आप- गांवर ताबा चालवितात.
 ब्रेटहार्ट दूर पश्चिमेकडल्या गोलार्धातल्या सोनें खणून काढ- णाऱ्या लोकांच्या छावणीचें वर्णन पुढें लिहिल्याप्रमाणें करितो.-
 “पैसा मिळविण्याच्या चढाओढीनें निस्तेज व निःसत्व झा- लेल्या शरीरांवर व तोंडांवर छावणीत पेटविलेला अग्नि आपल्या आरक्त ज्वाळांच्या प्रकाशानें आरोग्याची लाली चढवून, जणूं काय माणसांचा उपहास करीत होता. इतक्यांत एक उठला, व लहानशा गाठोड्यांत मोठ्या काळजीनें जपून ठेविलेलें पुस्तक त्यानें काढिलें; त्याबरोबर, खेळण्याची उमेद नसतां फक्त करम- णुकीकरितां हातीं घेतलेले पत्ते लगेच खालीं पडले, व माणसें तीच गोष्ट पुनः ऐकण्यास तयार झालीं. अंधकाराचें पटल चोहों- कडून गुरफटत चाललें आहे, अग्नि प्रकाशहीन होत चालला आहे, अशा वेळीं गुरूनें लहानग्या नेलची हकीकत ज्या पुस्त- कांत लिहून ठेविली आहे तें पुस्तक त्याने मोठ्यानें वाचिलें. पोराची कल्पना ह्मणा - कारण, वाचक सर्वात लहान होता- पण, तो वाचीत असतां सभोंवार असलेले सीडर व पाईन वृक्ष जणूं चुप राहिले आहेत, व देवदारू अंधकारांत ऐकण्याक- रितां जवळ जवळ येऊं लागले आहेत असा भास झाला; व ते