पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११९


कडील विचारसाम्राज्यांत ओढून नेतात, तेथें स्वार्थाच्या गोष्टी विरघळतात, व ह्या जगांतील चिंता व संकटें आपण विस- रून जातो.
 अशा वेळीं व्यत्यय येणें हा निर्दयपणाच होय. ह्याच्या विरुद्ध हॅमर्टन मोठ्या कळवळ्यानें बोलतोः - समजा, एकादा वाचक एकादा ग्रंथ वाचण्यांत चूर झाला आहे. तो ग्रंथकार कदाचित् निराळ्या युगांतला असतो व भिन्न सुधारणेच्या स्थितींतला अ- सतो. समजा, तुह्मी प्लेतोच्या ग्रंथांत लिहिलेला " साक्रेतिसाचें वादीस उत्तर " हा निबंध वाचीत आहां; तो सर्व देखावा चि- त्राप्रमाणें डोळ्यापुढे उभा राहिला आहे; ५०० लोकांचें तें न्यायमंडळ, ग्रीक लोकांचें तें अमिश्र बांधकाम, मनें वेधलीं आहेत अशी अथेन्सांतील प्रजा, तो दुष्ट मेलिटस, ते मत्सरी शत्रु, ज्यांचीं नांवें प्रिय व अमर झालीं आहेत असे ते साक्रेति - साचे प्रिय विलाप करणारे मित्र, मध्यभागीं गरीबांसारखा ह- लक्या व साध्या कापडाचा पोषाख घातलेला तो माणूस, (हे कपडे तो हिंवाळ्यांत व उन्हाळ्यांत सारखेच घालतो ) इत्यादि तुमच्या डोळ्यांपुढें दिसत आहेत; साक्रेतिसाचा तोंडवळा बहु- तेक कुरूप ह्मणण्याजोगा साधा आहे, तरी पण, त्यावर खऱ्या धैर्याची व शांततेची अशी विलक्षण झांक आहे कीं, कोणत्याही नटाला तिचें अनुकरण करितांच येणार नाहीं; ते अस्खलित शब्द तुमच्या कानांत गुंगत आहेत; ज्या भागांत प्रिटेनियममध्यें ठेवून मला सरकारच्या खर्चानें पोटास मिळावें अशी साक्रेतीस स्वतःला शिक्षा देतो, तो जोरदार भाग वाचण्याचा तुझीं आरंभ केला आहे; अशा वेळी वाचन संपेपर्यंत अडथळा आला नाहीं, तरच मानसिक श्रम करणाऱ्या लोकांचें बक्षिस ह्मणजे उदात्त सुख कांहीं क्षणभर तुह्मांस भोगावयास सांपडेल. "