पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८

 "मुलींचें शिक्षण" ह्या प्रकरणांत रस्किन ह्मणतो :- “ सर- क्युलेटिंग लायब्ररीमधलीं मूर्खत्वरूपी पुष्करणींतून उडणाऱ्या ताज्या तुषारकणांनीं चिम्म झालेलीं पुस्तकांचीं पुडकीं बाहेर निघाल्याबरोबर मुलींच्या ओटींत येऊन पडणार नाहींत अशी खबरदारी ठेविली पाहिजे. "

 पुस्तकांपासून शक्य असेल तेवढा फायदा व्हावा इतकेंच नाहीं, तर करमणूक व्हावी अशी इच्छा असल्यास, नुस्त्या क- रमणुकीखातर न वाचतां आपल्या उन्नतीकरितां पुस्तकें वा- चली पाहिजेत. साखर हा खाण्याचा महत्वाचा पदार्थ आहे, मुख्यत्वेंकरून मुलांस; तशीं सोपीं व मनोरंजक पुस्तकें अमोल आहेत; पण, नुस्त्या साखरेवर रहातां येत नाहीं, त्याप्रमाणें नुस्तीं सोपीं व मनोरंजक पुस्तकें वाचून चालत नाहीं.
 विशेष हैं; अशीं कांहीं पुस्तकें आहेत कीं, त्यांना पुस्तकें - णतां येत नाहीं. तीं वाचणें ह्मणजे वेळ फुकट दवडण्यासारखें आहे. कांहीं पुस्तकें इतकीं वाईट असतात कीं, तीं वाचून आ- पण दूषित झाल्याशिवाय रहात नाहीं; व तीं माणसें असती तर त्यांना लाथ मारून बाहेर काढिलें असतें. कांहीं ठिकाणीं आ- युष्यांतील भुरळ पडणाऱ्या गोष्टी व संकटें यांबद्दल सूचना मिळणें बरें, पण, ज्याच्या योगें आपणांस पापाचा परिचय होतो ती गोष्ट पापात्मकच होय.

 सुदैवच समजावयाचें कीं, इतर पुष्कळ पुस्तकें आहेत; तीं वाचून कोणाचेंही बरें झाल्याशिवाय रहावयाचें नाहीं. माणसास धंद्यांत व कामकाजांत मदत करणारेच ग्रंथ फक्त उपयुक्त ग्रंथ असें मी समजत नाहीं. पुस्तकांचा तोही उपयोग खरा, पण, तो उत्कृष्ट नव्हे. उत्तम पुस्तकें आपणांस स्वार्थाच्या पली-