पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११७

अनुभवानें शहाणा होण्याचा यत्न करितो तो आपणांस मोठ्या धोक्यांत घालून घेतो. पुष्कळ गलबतें फुटल्यावर जो तांडेल शहाणा होतो तो दुर्दैवी होय; व पुष्कळ वेळां दिवाळें फुंकल्या- वर जो व्यापारी श्रीमंत व शहाणा होतो तोही दुर्दैवी. अनुभ- वानें जें शहाणपण मिळतें तें महाग होय. फार वेळ भटकल्यावर जवळचा रस्ता सांपडला ह्मणजे किती दुःख वाटतें, हें अनुभ- वावरूनच कळतें. जो अनुभवानें शहाणपण मिळवितो तो हुशार खरा; पण तो, एकादा जलद धांवणारा असून जसा रात्रीं रस्ता सोडून कोणीकडेच भटकत जातो, व कोठें जातो हें त्याचें त्या- लाच कळत नाहीं, असल्या माणसाप्रमाणें होय. आणि खरोखर ज्यांना विद्येच्या द्वारें अनुभव मिळालेला नसतो असे लोक शहाणे असून सुखी थोडेच. ज्यांनीं अभ्यासाशिवाय फारा दिवसांच्या अनुभवानें थोडें शहाणपण व सुख मिळविलें असेल, (मग तुमच्या उदाहरणाचा माणून लहान असो व मोठा असो) असल्या लोकांचा पूर्वीचा आयुष्यक्रम पहा, त्यांनी कोणकोणते अपराध केले, कोणकोणत्या संकटांतून ते निभावले, त्याचा तुह्मी विचार करा, (व संकटांतून निभावतांना २१ पैकी २० माणसें हार जातात. ) नंतर आपल्या स्वतःच्या मुलानें सुख च शहाणपण असल्या अनुभवानें मिळविणें बरें किंवा वाईट ह्याचा विचार करा. "
 पुस्तकांची निवड करणें हें काम मित्रांची निवड करण्यासा- रखेंच कठीण आहे. आपण कर्म करितों त्याबद्दल जसे आपण जबाबदार आहोंत, तसे आपण जें वाचितों त्याबद्दलही आ. होंत. मिल्टनचे पुस्तकाबद्दलचे मोठे उदात्त उद्गार पुढें दिले आहेत:- "चांगलें पुस्तक ह्मणजे अधिकारी माणसाचें मोलवान् जीवितरक्त होय. जणूं मेल्यानंतर येणाऱ्या इतर प्राण्यांसाठीं तें मसाले घालून सांठवून ठेविलेलें होय. "