पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६

रीबीनें राहून जवळ बरीचशीं पुस्तकें असणें, हें राजा होऊन चाचण्यास पुस्तकें नसणें, ह्यापेक्षां बरें. "
 पुस्तकें इंद्रजालविद्येनें निर्माण केलेलीं विचारोद्यानें देतात. जीन पॉल रिक्टर ह्मणतो-सिंहासनावरून दिसणाऱ्या देखाव्यापेक्षां शारदेचें वसतिस्थान जें पार्नासस पर्वताचें टोंक त्यावरून दिस- णारा देखावा विस्तृततर आहे. एकपक्षीं, प्रत्यक्ष गोष्टीपेक्षां पुस्तकें स्पष्टतर कल्पना मनांत आणितात, ज्याप्रमाणें सृष्टपदार्थापेक्षां त्यांचीं प्रतिबिंबें जास्त शोभायमान दिसतात. जॉर्ज मॅकडोनल्ड स्वणतो- “सर्व आरसे भारलेले असतात, आरशांत पाहूं लागलों ह्मणजे साधी खोली देखील कवितेंत वर्णिलेल्या खोलीप्र- माणें भासते. "
 पुस्तक आपणांस मनोरंजक वाटलें नाहीं तर तो पुस्तकाचा अपराध असें होत नाहीं. वाचण्यांत देखील एक प्रकारचें कसब लागतें. नुस्ते शब्द वाचून जाणें फारशा उपयोगाचें नाहीं. जें वाचितों तें प्रत्यक्ष अनुभवितों अशा रीतीनें वाचलें पाहिजे. मला लिहितां वाचितां येतें असें प्रत्येकास वाटतें. पण, फार चांगलें लिहितां फारच थोड्या लोकांस येतें, व कसें वाचावें हें अग- दींच थोड्या लोकांस कळतें. निष्काळजीपणानें, अर्थ समजून न घेतां नुस्ते शब्दामागून शब्द वाचले, किंवा ओळींवरून डोळे फिरविले, अथवा पानें चाळलीं ह्मणजे पुरें झालें असें नव्हे. जे देखावे वर्णिलेले असतील ते डोळ्यांपुढें प्रत्यक्ष आणण्याचा यत्न केला पाहिजे, व जीं पात्रें आलीं असतील तीं कल्पनाशक्तीच्या चित्रमहालांत हुबेहूब रंगवून उतरविली पाहिजेत. अॅश्चामा- णतोः ---“अनुभवानें जें ज्ञान २० वर्षांत मिळतें, तें विद्येमुळें एका वर्षात मिळतें. अनुभव मनुष्यास शहाणा करितोच, पण विशेष दुःखांत लोटितो; विद्या त्याशिवाय शहाणपण देते. जो