पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११५

ते लोक शेवटी असेंच सांगतात कीं, आपणांस खरें अमिश्रित सुख वाचनापासूनच मिळालें. “पंतोजी" नांवाच्या पुस्तकांत अ- श्राम लेडी जेन ग्रेच्या शेवटच्या भेटीबद्दल अशी हृदयद्रावक गोष्ट सांगतो. सॉक्रेतीसच्या मरणाबद्दल प्लेतोनें लिहिलेला र- साळ वृत्तांत वाचीत एका दीर्घ वर्तुळाकृति खिडकीजवळ ती बसलेली त्याला आढळली. तिचा बाप व आई उद्यानभूमींत शि- कार करण्यांत गुंतलीं होतीं. शिकारी कुत्रे मोठ्यानें भुंकत होते; त्यांचा आवाज खिडकींतून ऐकू येत होता. ती त्यांच्या बरोबर शिकारीस गेली नाहीं ह्याबद्दल अश्चामनें आश्चर्य प्रदर्शित केलें. तेव्हां ती ह्मणाली, त्यांना मैदानांत जो आनंद होतो तो मला प्लेतो वाचतांना जो आनंद होतो त्या मानानें मृगजळाप्रमाणें आहे.
 मेकॉलेस संपत्ति, कीर्ति, सरदारी, अधिकार इत्यादि गोष्टी अनुकूल होत्या; तरी पण आपल्या चरित्रांत आयुष्यांतील अत्यंत सुखाचा वेळ पुस्तकें वाचून गेला, असें तो ह्मणतो. एका लहान मुलीला त्यानें एक मौजेचें पत्र लिहिलें आहे त्यांत तो असें ह्म- णतो - "फार सुरेख पत्र पाठविलेंस ह्मणून मी आभारी आहें. माझ्या छोनुकलीला सुखी करणें मला नेहमीं आवडतें. माझ्या बाळीला पुस्तकें आवडतात हैं ऐकून मला जितका आनंद झाला आहे तितका दुसरा कशानेंही होत नाहीं. कारण, तूं माझ्या एवढी मोठी झालीस कीं, मुरांबे, पोळ्या, खेळणीं, खेळ किंवा जगांतले सर्व देखावे ह्या सर्वापेक्षां पुस्तकें चांगलीं हैं तुला आढळून येईल. मला कोणीं राजा केला, राहण्यास राजवाडा दिला, सुग्रास अन्न दिलें, निरनिराळीं पेयें, गाड्याघोड्या, चाकर- माणसें दिलीं, व एक अट केली कीं, मी पुस्तकें वाचूं नये तर मी राजा होण्याचे कबूल करणार नाहीं. एकाद्या कातऱ्यांत ग-