पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४

दनवनासारखी आहे. त्यांत पुरातनकाळच्या विद्वानांबरोबर व तत्वज्ञान्यांबरोबर तासांचे तास मी संभाषण करीत बसतो. कांहीं पालट असावी ह्मणून राजे व बादशहा ह्यांच्या बरोबर हितगूज करितों; त्यांच्या उपदेशाचा सार काढितों. त्यांनीं जर अन्यायानें जय मिळविले असले, तर त्यांस दोष देतों; व यो- ग्यता नसतां त्यांच्या स्मारकाकरितां पुतळे उभारले असले तर माझ्या मनोराज्यांत त्यांचा विध्वंस करितों. असलें चिरस्थायी सुख सोडून नश्वर दिमाखीच्या गोष्टींकडे मी वळू कसा ? पैशाच्या राशीच्या राशी करण्याचें काम तुमचें तुह्मांला असो; ज्ञानभांडार वाढविण्याचें काम मला पुरे आहे.
 पुस्तकांची वारंवार मित्रांबरोबर तुलना केली जाते, परंतु निर्दय यम प्राणधारी मित्रांपैकीं उत्तम व आनंदी मित्र हिरावून नेतो. उलट पक्ष, पुस्तकांपैकीं वाईट पुस्तकें काळ नाहींशीं करितो, व चांगल्यांचें संशोधन करितो.
 “ शहाणे कविजन व विद्वान् घ्या. पुस्तकें एकीकडे ठेवून विचार केला तर त्यांची राखरांगोळी झाली आहेच. पुस्त- कांच्या द्वारे त्यांचा विचार केला तर कबरस्थानांतून पुनः उठ- लेल्या देवदूतांप्रमाणें ते भासतात. आयुष्यमार्ग कंठित असतां आपल्याबरोबर येतात व आपणांस वारंवार सूचना देतात. आ- पण कांहीं पुस्तकांस अमर समजतों. तीं जिवंत का आहेत ? हैं खरें मानिलें तर तीं कालक्षेपामुळे पवित्र झाली आहेत. पुस्तकां- पैकीं खट्याळ पुस्तकें शेवटच्या समाधीस लागतात. पापरूपी वस्तु जगांत राहूं नये अशी ईशाची इच्छा आहे. नश्वर भाग नाहींसा होतो व कायमचा भाग शेष रहातो. ज्याप्रमाणें आत्म्याला वेष्टून असणारें मृण्मय शरीर खडून जातें. "
 ह्या जगांत जें मिळणें शक्य आहे तें ज्यांच्या जवळ आहे,