पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ९.


वाचन.

 व्यक्तीस जशी स्मरणशक्ति तशीं राष्ट्रास पुस्तकें. त्यांमध्यें आ- पल्या जातीचा इतिहास, आपण शोध केले आहेत ते, काला - नुकालाचा अनुभव व ज्ञान असतें. सृष्टिसौंदर्य व चमत्कृति ह्यांचें चित्र तीं आपल्यापुढे उभें करितात; संकटांच्या वेळी मदत करितात; दुःखांच्या व शरीरक्लेशांच्या वेळीं आपलें समाधान करितात; करमत नसतां वेळ सुखांत घालवितात; कल्पनातरं- गांनीं मन भरून काढितात; चांगल्या व सुखकारक विचारांनीं पूर्ण करितात; व आपणांस स्वार्थापलीकडे लक्ष देण्यास लावितात.
 पूर्वेकडील एक कल्पित गोष्ट आहे. ती हीः- एक राजा होता, त्याला प्रत्येक रात्रीं मी भिकारी आहे असे स्वप्न पडे. दुसरा एक भिकारी होता, त्याला मी राजा आहें व राजवाड्यांत रहातों असें स्वप्न पडे. त्या राजाची स्थिति जास्त सुखाची होती असें माझ्यानें खात्रीनें सांगतां येत नाहीं. कल्पनाशक्तीनें मनामध्यें आणलेले चित्र कधींकधीं प्रत्यक्ष गोष्टीपेक्षा जास्त ढळढळीत असतें. तें कांहीं असो; पण वाचतांना आपणांस राजे होऊन राजवाड्यांत रहातां येईल, इतकेंच नव्हे, तर त्याहीपेक्षा जास्त चांगली अवस्था आपणांस येईल. ह्मणजे कल्पनाशक्तीच्या सहा- य्यानें श्रम, आयास व खर्च झाल्याशिवाय गिरिकंदरीं, समुद्र- किनाऱ्यावर किंवा इतर रम्य ठिकाणीं जातां येईल.
 फ्लेचर ह्मणतो – मला स्वतःची करमणूक करून घेऊं द्या. ज्या जागेत माझे मोठे मित्र पुस्तकें आहेत, ती जागा मला नं-