पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२

पुस्तकें निवडून दिलींत तर तसें होणार नाहीं. ऐतिहासिक युगांतील उत्तम लोकांशी त्यांची मैत्री करून देतां. ज्या मा- णसांनीं नरजातीला सुशोभित केलें, अशा सर्वोत हुशार, सर्वात जास्त कोमल मनांच्या, सर्वात शूर, शुद्धाचरणी माणसांशीं त्यांची ओळख करून देतां तुह्मी त्याला प्रत्येक राष्ट्राचा रहि वाशी, प्रत्येक युगाचा समकालीन करितां हें जगच त्यांच्या साठीं केलें आहे."
 पुस्तकें बहुतांशीं जीवंत माणसें होत. मिल्टन ह्मणे - " पुस्त - कांत सजीव प्रजा भरलेली आहे, व ज्या प्राण्यांची ती प्रजा त्या प्राण्यांइतकीच ती तरतरीत असते." मोठ्या ग्रंथकारांस कधीं मरण नाहीं. “ज्याचें तेजस्वी मन तुझ्या मनास उन्नत दशेस नेतें, तो माणूस खरोखर मेला नाहीं. जीं माणसें आपण सोडून जातों त्यांच्या हृदयांत रहाणें हें मरण नव्हे. "
 ड्यूक अर्बिनोनें आपल्या शहरांत मोठें पुस्तकालय स्थापिलें. त्यानें असा नियम केला कीं, प्रत्येक पुस्तक लाल रंगाच्या कापडानें बांधवावें, व त्याला रुपेरी वेलबुट्टी असावी. पुस्तकें हा गत युगांत सांठवून ठेविलेला खजिना होय. जेवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानितों त्यापेक्षां नवीन पुस्तक वाचण्यापूर्वी मानणे जास्त सयुक्तिक आहे, असें लॅम्ब ह्मणे.
 नुसत्या दारूमागे किती पैसा जातो हें लक्षांत आणिलें, तर पुस्तकांमागें आपण वावगा खर्च करितों असा आपणांवर कोणा- सही आरोप आणितां येणार नाहीं. दारू सांठवून ठेवण्याच्या तळघरांपेक्षां पुस्तकालयांस किती थोडा खर्च लागतो ? सार्वज- निकगृह असें जेव्हां आपण ह्मणतों, तेव्हां दारू विकण्याची जागा हा त्याचा अर्थ असतो हैं ऐकून किती वाईट वाटतें ! पण, दारूचा पुरवठा करण्याच्या ऐवजीं पुस्तकांचा पुरवठा करण्या- करितां सार्वजनिक गृहें उठत आहेत हें ऐकून आनंद वाटतो.