पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


सल्ला हीं घेतली पाहिजेत, अथवा शिक्षणाच्या योगानें किंवा प्रकृतिस्वभावाच्या योगानें हे दोष आपणांस टाळतां आले पाहिजेत.

 आपलें शिक्षण हा आपल्या शरीराचा एक भाग मानिला पाहिजे. सदोदित प्रत्येक माणसाला निदान एका शिष्याला ह्मणजे स्वतःला तरी शिक्षण व वळण द्यावयाचें असतें.

 स्वतः शिकलेल्या गोष्टी जशा आपल्या होतात तशा दुसऱ्यांनीं शिकविलेल्या होत नाहींत. म्हणून शाळा सुटली ह्मणजे आपलें शिक्षण पुरें झालें असें नव्हे. तर त्या वेळीं शिक्षणाला कोठें नुक्ताच आरंभ झालेला असतो इतकेंच. शिक्षण आयुष्यभर चाललेलेंच असतें. सेनिका ह्मणतो “ मनुष्यें आपल्या शरीराला जसा व्यायाम करवितात त्याप्रमाणें मेंदूला करवितीं तर किती चांगलें झालें असतें ? त्याचप्रमाणे क्षणिक सुख मिळविण्याकरितां जितकी मेहनत घेतात तितकी सद्गुण संपादण्यासाठीं घेत असतीं तरी किती चांगलें झालें असतें ? मनुष्यवर्गातील कांहीं जाती दैववादी आहेत. सर्व कांहीं ईश्वरानें ठरवून ठेवि- लेलें असतें, भवितव्यता चुकत नाहीं, मग मनुष्य यत्न करो वा न करो, मनुष्य कळसूत्री बाहुला आहे, त्याला ईश्वर वाटेल तसा नाचवितो असें त्यांचें मत आहे. ह्मणून विचार करण्याजोगता मुद्दा हा. इतर शास्त्रांप्रमाणें संसारशास्त्र आहे किंवा काय ? संसारांतील सर्व बऱ्या वाईट गोष्टींस मर्यादित करणारे असे कांहीं नियम आहेत कीं काय ? आपलें जहाज ह्या कालसमुद्रांत इच्छित ठिकाणी नेतां येईल किंवा वाऱ्याच्या आणि लाटांच्या जोरानें जेथें जाईल तेथें खरें ? ह्या प्रश्नांचें उत्तर स्पष्ट आहे. “ मनुष्य हा मानवी प्राणी आहे आणि त्याला दैव आपल्या कांत ठेवितां येईल. "व जर ठेवितां आलें नाहीं तर दोष