पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१११

मुत्सद्दी ह्यांच्या बद्दल आपणांस जेवढा अभिमान असतो, तेवढा ह्या मजुरांबद्दल असला पाहिजे.
 " सुधारलेलीं राष्ट्रें " असें आपण नेहमीं ऐकतों, आणि खरो- खर कांहीं राष्ट्रं इतर राष्ट्रांपेक्षां जास्त सुधारलेलीं असतात. पण कोणत्याही राष्ट्राला "सुधारलेलें" ह्या विशेषणाच्या जवळ आ- पण येऊन पोहचलों आहोंत असें ह्मणण्याचा देखील अधिकार नाहीं. आपली सुधारणा अन्वर्थक झाली पाहिजे; व पुस्तकालयें स्थापणें हें सुधारणेच्या खऱ्या मार्गातले पहिले पाऊल होय.
 घरधन्यांस मत देण्याच्या अधिकाराचें बिल जेव्हां पसार झालें तेव्हां लार्ड शेरब्रूक असें ह्मणाला - आपण धन्यांस शिक्षित केलें पाहिजे, पण, त्यांना स्वतःस शिक्षण देतां यावें असें करणें अधिक महत्वाचें आहे.
 ज्यांचा जन्म ह्मणजे काबाडकष्ट करण्याची जन्मठेप अशीं माणसें पुष्कळ आहेत. तरी त्यांचा जन्म फुकट जावा, किंवा त्यांस सुख होऊ नये असें नाहीं. ह्याकरितां त्यांना थोड्या क- रमणुकीच्या गोष्टी असाव्यात व आयुष्यक्रमांत थोडा पालट सहज मिळण्याजोगीं असणें व्हावा. अतएव चांगलीं पुस्तकें हैं अधिक इच्छित होय.

 मोठ्या शास्त्रवेत्यांपैकीं एक सर जॉन हर्शल ह्मणतो -- "निर- निराळ्या हालहवालीच्या वेळीं उपयोगीं पडेल; जिवांत जीव आहे तों सुखाचें व आनंदाचें उत्पत्तिस्थान होईल; कोणतेही प्रसंग आपणांवर येवोत, व जग कसेंही खावयास उभें राहो, आयुष्यांतील संकटरूपी शस्त्रांपासून संरक्षण करणारें कवच हो- ईल; अशी अभिरुचि मला ईश्वराकडून मागून घ्यावयाची अ- सली, तर ती वाचनाची अभिरुचि होय. माणसास ही अभि- रुचि लावा, व ती तृप्त करण्याची साधनें त्याला द्या, ह्मणजे, तो सुखी होणार नाहीं असें क्वचित् घडेल. मात्र तुझीं वाईट