पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०

आहे त्यांच्या उपयोगाचें, असा समज झालेला दिसतो. पण ही चुकी आहे. राष्ट्राच्या उन्नतीबद्दल आपण कोणाचे ऋणी आहोंत ? अंशतः सुज्ञ राजे, सुज्ञ मुत्सद्दी, अंशतः आपलें शूर सैन्य व आरमार, ज्यांनीं वसाहतींतलें साम्राज्य स्थापण्यास मार्ग खुला करून दिला असे शोधक प्रवासी, व अंशतः विद्याव्या- संगी लोक व तत्ववेत्ते ह्यांचे निःसंशय आपण ऋणी आहोत. ह्यांनीं जें संपादित करून दिलें तें आपण लक्षांत वागविलें पा- हिजे, व त्याबद्दल कृतज्ञ असलें पाहिजे; परंतु, त्रितिश मजुरांनीं आपल्या शक्तिमान् बाहूंनीं काम करूनही आपल्या मेंदूचा उपयोग केला, व आमचा फायदा करून दिला त्यांना विसरतां कामा नये.

 वॉट हा यांत्रिक एन्जीनीअर होता; ज्याच्या गिरणींतल्या यंत्रांच्या सुधारणेमुळें राष्ट्रीय कर्जाच्या संख्येपेक्षां जास्त संपत्ति इंग्लंद देशास मिळाली तो हेन्री कोट कुंभा- राचा मुलगा होता; ओंतीव पोलाद शोधून काढणारा हन्ट्- समन हा घड्याळें तयार करणारा होता; क्राम्टन कोष्टी होता; वेजवुड कुंभार होता; ब्रिडले, टेलफर्ड, मुगट, नीलसन हे म जूर होते; जार्ज स्टिफन्सनें दिवसां दोन पेन्साला गुराख्याचें काम करून पोट भरण्यास सुरुवात केली व १८ वर्षांचा होई तोपर्यंत त्याला वाचतां येत नव्हतें; डॉल्टन कोष्टयाचा मुलगा होता; न्युकामनही तसाच होता; फॅरडे घिसाड्याचा मुलगा होता; आर्कराइटनें हजामाचा धंदा पत्करिला होता; सर हम्फ्री डेव्ही हा वैद्याच्या घरीं शागीर्द होता; बर्मिंगाम शहराचा केवळ पिता बोल्टन हा बटनें तयार करणाऱ्याचा मुलगा होता; आणि वॉट सुताराचा मुलगा होता; ह्यांचें व ह्यांच्या सारख्या इतर माणसांचें जग ऋणी असलें पाहिजे. मोठाले लढवय्ये व