पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०९

जास्त लोकांस जास्त सुख होईलसें आपणांस वाटत नाहीं, ह्म- णून आपण सोशियालिस्ट बनत नाहीं. परंतु जगांत ज्या अडचणी येतात त्या पुस्तकांस लागू नाहींत. एका बाईनें समुद्र पहिल्यानेंच पाहिला ते वेळीं तिला आनंद झाला, असें सांगतात. ती ह्मणाली- “जो सर्वास पुरेल असा पदार्थ पाहणें हें मोठें न- शीब. " हैं पुस्तकांसही लागून आहे. प्रत्येकास पुरतील इतकीं पुस्तकें आहेत, व चांगलीं पुस्तकें अतिशय स्वस्त असतात. वा- चनसुखास पैशाचा फारसा उपयोग होत नाहीं. हैं इतर फार थोड्या गोष्टींस लागू आहे. कामाच्या इंद्रजालांत आपण सांप- डलों आहोंत तेव्हां आपणांस आहे त्यापेक्षां जास्त हवेंसें नेहमीं वाटते; पण, दैवानें पुस्तकांत आपणांस उपयोग करितां येईल त्यापेक्षा जास्त सांपडतें.

 शिक्षण आयुष्यभर रहावें, मुलांचें शिक्षण ह्मणजे नुस्तें थो- डेंसें व्याकरणाचें व शब्दांचें ज्ञान इतकेंच नसावें, तर त्यांना हातांस व डोळ्यांस वळण देणारेंही शिक्षण असावें; त्याचप्रमाणें पुरुषांचें व स्त्रियांचें आयुष्य पैसा किंवा हस्तकौशल्य मिळवि- ण्यांतच जाऊं नये, तर त्यांनीं कांहीं वेळ ज्ञान संपादण्यांत किंवा मनाची उन्नति करण्यांत घालवावा; इत्यादि गोष्टींचें महत्व आतां आपणांस कळूं लागलें आहे. विशेष, मनुष्याच्या ज्ञान- भांडारांत प्रत्येक माणसानें थोडी थोडी भर कां टाकू नये ? माण- साची स्थिति कितीही गरीबीची असो त्याला हैं करितां येईल. शारीरिक श्रमाची महती आपणांस अद्यापि कळत नाहीं; व शास्त्रज्ञान आपल्या आटोक्याच्या बाहेर अंतरालांत कोठें तरी आहे असा साधारण समज झालेला दिसतो; व तें तत्वज्ञा- न्यांच्या किंवा कुशाग्रबुद्धीच्या माणसांच्याच उपयोगाचें, अथवा फार मोलाचें प्रयोग्य साहित्य ज्यांना विकत घेण्याचें सामर्थ्य
 १०