पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८

वितां कामा नये. फुरसत असणें ही मोठी ईश्वरी देणगी, व आळस हा मोठा शाप; फुरसत सुखाचें उत्पत्तिस्थान, आळस दुःखाचें उत्पत्तिस्थान. समजा गरीब माणसास कांहीं दिवस काम नाहीं; त्यानें काय करावें ? त्यानें आपला वेळ कशांत घालवावा ? त्याला जर पुस्तकालयांत जातां आलें, तर तो फुरसतीचा वेळ फुकट जाणार नाहीं.

 मुलांस शिक्षण देण्यास जीं कारणें आहेत तींच कारणें व- यांत आलेल्या माणसांस शिक्षण देण्यास आहेत. देशभर प्राथमिक शिक्षण देणाऱ्या चांगल्या शाळा झाल्या आहेत. आ- पल्या मुलांस शिक्षण द्यावें ह्मणून आपण होईल तितकी खटपट करितों; त्यांस वाचावयास शिकवितों; वाचनाची अभिरुचि लाव- ण्याचा यत्न करितों. असें आपण कां करितों ? तर शिक्षणापा- सून माणूस सुधारल्याशिवाय रहाणार नाहीं, अशी आपली खात्री असते. कारण, शिक्षणापासून माणूस चांगला कारागीर बनतो इतकेंच नव्हे, तर कारागिराच्या अंगांत माणुसकी येते. परंतु हें शिक्षण थांबतां कामा नये ह्मणून मोठ्या माणसांसाठीं पुस्तकालयें ह्या शाळा होत. आलफ्रेड राजाबद्दल एक गोष्ट आहे, ती अशी ः – तो लहान असतां एकदां त्याचें मन एका पुस्तकावर गेलें; त्याची आई ह्मणाली- “जो हैं पुस्तक पहिल्यानें वाचावयाला शिकेल त्याला हें पुस्तक मिळेल, ” आणि त्याच अधिकारानें त्यानें तें पुस्तक मिळविलें. आपलीं मुलें वाचायला शिकलीं आहेत. मग पुस्तकांवर त्यांचा अधिकार पोहचत नाहीं काय ? सोशियालिझमचें समर्थन करणारे लोक त्यापासून जे फायदे होतील असें सांगतात, ते खरोखर होतात असें लोकांस बाटलें, तर पुष्कळ लोक सोशियालिस्ट नाहींत ते सोशियालिस्ट होतील. सोशियालिझमचा नेहमीं जो अर्थ घेतात त्याप्रमाणें