पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०७

जें आतां इतकें सुलभ झालें आहे तें करण्यास त्यांला मोठी मेहनत व अक्कल खर्चावी लागते. शेतीकाम करणारास पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. त्याला पेरणी, मळणी, कापणी इत्यादि कामें करावीं लागतात. एका ऋतूंत तो धान्य पेरतो; दुसऱ्या ऋतूंत कुऱ्हाड, कोयती ह्यांचा उपयोग करितो; मेंढरें, डुकरें, गुरेढोरे ह्यांच्याकडे त्याला पहावें लागतें. नांगर धरणें, कुंपणें घालणें, धान्याच्या पेंढ्या बांधणें हें जितकें सोपें वाटतें तितकें नाहीं. वर्डस्वर्थविषयीं अशी आख्यायिका आहे : - एका परक्या माणसाला त्याची अभ्यासाची खोली पाहावयाची होती, तेव्हां त्याच्या मोलकरणीनें उत्तर केलें "ही माझ्या धन्याची खोली, पण ते शेतांत अभ्यास करितात.” शेतकऱ्याला शेतांत बऱ्याच गोष्टी शिकतां येतात. आपणांस वाटतें त्यापेक्षां त्याला जास्त कळतें. मात्र तें ज्ञान पुस्तकांतून मिळविण्याच्या ऐवजी शेतांतून मिळविलेलें असतें. पण त्यामुळें तें कमी योग्यतेचें असें नव्हे.
 जो माणूस कारखान्यांत किंवा वखारींत खपत असतो त्याचे काम एकाच तऱ्हेचें असतें. त्याचें सर्व वर्ष एकच कृति कर- यांत, किंवा एकाद्या कृतीचा एकच भाग करण्यांत जातें. त्या कामांत बहुतेक अद्भुत अमानुषी चातुर्य त्याला येतें, ह्यांत संशय नाहीं. पण तें तितक्यापुरतेंच. ज्याला नुस्तें सजीव यंत्र बनून राहावयाचें नसेल, त्यानें साधारणपणें पुस्तकें वाचून, जरूर असणारें मनोरंजन व करमणूक करून घेतली पाहिजे. कांहीं ठिकाणी तर मनोरंजन व करमणूक करून घेण्यास वाचणें हाच उपाय असतो. दुकानें शिवाय करून इतर धंद्यांतले का- माचे तास कमी करण्याकडे लोकांचा कल झाला आहे हें पाहून समाधान वाटतें. पण मधून मधून काम सांपडत नाहीं हें कमी समाधानकारक आहे. पण हा फुरसतीचा वेळ आळसांत घाल-