पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६

आहे, हें कृतज्ञतापूर्वक कबूल केलें पाहिजे. शाळा, पुस्तकालयें, चमत्कारिक पदार्थसंग्रहालये, ह्यांच्यांत घातलेला पैसा खर्ची गेला नाहीं; तो ठेवीप्रमाणें आहे. आपले पैसे वांचतात ह्मणून शाळा काढाव्या, व सार्वजनिक पुस्तकालयें असावीत असें आह्मी ह्मणत नाहीं; तर आपल्या बांधवांचा आयुष्यक्रम सुखावह व सुसह व्हावा ह्मणून तीं असावीत. अगदीं गरीब मनुष्यांच्या आयुष्यांत करमणुकीच्या गोष्टी अगदींच थोड्या असतात.
 पुढल्या पिढीस मोठे जंगी वाचक ह्मणजे कारागीर व मजूर असतील, असें माझें मत देतों ह्मणून पुष्कळ वेळां लोक मला मौजेनें हांसले आहेत.
 पण, सार्वजनिक पुस्तकालयें सारखीं वाढत चालली आहेत, हें माझ्या मताला पुष्टीकरण देणारें प्रमाण नव्हे काय ? फुकट पुस्तकालयें स्थापण्यापूर्वी सर्व लोकसमूहाचें मत घ्यावें लागतें; आणि पाद्री, वकील, डॉक्टर, व्यापारी हे मत देणाऱ्या लोकां- पैकीं फारच थोडे होत. सार्वजनिक पुस्तकालयें, कारागीर, व लहान सहान किरकोळ मालाचे व्यापारी, ह्यांनीं स्थापिलेलीं अस- तात; व त्यांचा मुख्यत्वेंकरून तेच उपयोग करितात. आ- पल्या शहरांतील मजुरांस पुस्तकांची आवश्यकता आहे, कारण, त्यांचा आयुष्यक्रम कधीं न बदलणारा असतो. रानटी माण- सांच्या आयुष्यक्रमांत त्यांच्या आयुष्यक्रमापेक्षां जास्त पालट होते. सावजांची चालचालणूक, त्यांचें स्थलांतर, भक्ष्य शोधण्याची जागा ह्यांची त्यांना बारकाईने चौकशी ठेवावी लागते. कोठें मासे मिळतील, कसे मिळतील हें त्यांला शिकावें लागतें. प्रत्येक महिन्यास त्यांला नवीन धंदा करावयाचा पडतो; व नवीन नवीन खाण्याचे पदार्थ सांपडतात. त्यांला आपलीं हत्यारें तयार करावी लागतात; घर बांधावें लागतें; अनि पेटविणें हें