पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५

पुस्तकें किती स्वस्थ झाली आहेत ? थोडीशी दारू किंवा तंबाकूच्या दोनच चिलिमी मिळतील इतक्या थोड्या पैशांत महिनाभर वाचायला पुरतील इतकीं पुस्तकें किंवा वर्त- मानपत्रे विकत घेतां येतील. त्या गृहस्थाच्या वेळीं पुस्तकें फारच महाग होतीं. आणखी सध्यां आपलीं पुस्तकें लहान असून सुबक असतात. त्यांचीं पुस्तकें अवजड, लांबलचक, व वाचण्यास किंवा हातांत धरण्यास सोईवार नव्हती. उत्कृष्ट ज्ञानानें भरलेलीं पुस्तकें देखील सध्यां एका अर्थानें वा सोप आहेत; व सर्वांत विशेष महत्वाची गोष्ट ह्मणजे ड़ बूरीच्या वेळीं जीं अतिशय मनोरंजक पुस्तकें होतीं, तीं असूनही सध्यां तसलीं आणखी जास्त पुस्तकें आहेत. प्राचीन ग्रंथांपैकी बरेच गहाळ झाले होते, ते सध्यां पुनः उपलब्ध झाले आहेत. त्याच्या वेळीं कादंबरी ह्मणजे बहुतेक माहीतच नव्हती असें ह्मणतां येईल. कवितेविषयीं ह्मणाल तर आजकालचे ग्रंथकारांच काय, पण शेक्सपियर, मिल्टन, बायरन, स्कॉट यांच्यापूर्वी तो होऊन गेला. कॅफ्टन कुक, डार्विन, हम्बोल्ट, व इतर प्रवाशी व शोधक ह्यांचीं आनंदकारक व चटकदार प्रवासवृत्तें आह्मांस वाचायला सांपडतात. शास्त्रांत रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र हीं नवीन उदयास आलेलीं आहेत, व अनेक शोधांच्या योगें सृष्टप्राणिशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल इत्यादि इतर शास्त्र अधिक मनोरंजक झाली आहेत.
 शापेनहार ह्मणतो — “माझ्या शास्त्रज्ञानामुळे जरी मला पैंचें उत्पन्न झालें नाहीं, तरी त्यामुळे माझा बराच खर्च वांचला. राष्ट्रदृष्टीनें पाहिलें असतां, शास्त्राभ्यासामुळे आमचें उत्पन्न फारच वाढले आहे, व अनेक प्रकारांनी आमचा खर्चही कमी झाला