पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ८.


पुस्तकालयें.

  डहमचा बिशप रिचर्ड ड बुरी हा एक मोठा इंग्रज होऊन गेला. त्यानें ५०० वर्षापूर्वी पुस्तकांची प्रशंसा करितांना जें बोलून ठेविलें आहे तें अगदी बरोबर आहे. "पुस्तकें गुरूदाखल आहेत. ती अंगास छडी लाविल्याशिवाय, किंवा थापट्या मा- रिल्याशिवाय शिकवितात. तीं रागावत नाहींत, किंवा जड शब्द बोलत नाहींत. त्यांना पैसेही द्यावे लागत नाहींत, अथवा कपडे पुरवावे लागत नाहींत. त्यांच्या जवळ जेव्हां जावें तेव्हां हे गुरु नेहमी जागेच असतात. ज्ञानशोधार्थ जर प्रश्न केले तर ते छपवून ठेवीत नाहींत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तुह्मांस कळला नाहीं तर ते रागावत नाहींत. तुझीं अज्ञान दाखविलें तर ते तुह्मांस हांसत नाहींत. तेव्हां असल्या शहाणपणाने भरलेलें पुस्तकालय दौलतीपेक्षां जास्त आहे. आपल्या इच्छित वस्तूंमध्यें त्याच्या तोडीची एकही नाहीं. सुख, शहाणपण, शास्त्रे, व धर्म- बुद्धि, ह्यांचें अन्वेषण करण्याची आपणांस उत्कट इच्छा आहे असें जो कबूल करितो त्याला वाचन प्रिय असलेच पाहिजे."
 जर इतक्या प्राचीन काळीं त्याला असें ह्मणतां आलें, व त्या वेळीही जर तें खरें होतें, तर आजकाल आह्मांस काय हृाटलें पाहिजे ? त्याच्यापेक्षां आपली स्थिति आतां किती सुधारली आहे ह्याचा आपण विचार करूं. पहिल्यानें मुद्रणसं-स्थेपासून झालेला फायदा जरी एकीकडेस ठेविला तरी आतां