पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०३

कळूं लागतें. सृष्टीचें पुस्तक आपल्यापुढे उघडून पडतें, व कोठेही असलो तरी मन गढविणाऱ्या गोष्टी तें मिळवून देतें. "
 “तोच खरा माणूस. गुणावगुणांचा विचार केला तर त्याच्या सारखा माणूस पुन: माझ्या दृष्टीस पडावयाचा नाहीं" हें लोक आपल्याविषयीं ह्मणतील असें जरी आपणांस वाटत नसलें, तरी “ह्याच्या आयुष्यक्रमांत रोजरोज वाखाणण्याजोगें सांपडतें" असें आपल्याविषयीं ह्मणणें खरें असावें; कारण, आपणां स- वांच्या ठायीं आपलें नांव अमर व्हावे अशी इच्छा असते.

 प्रत्येक उदाहरणांत शिक्षण फायदेशीर झालेले नसलें, तर तो शिक्षणाचा अपराध नव्हे. ज्या बुद्धीनें तें देण्याचें काम होतें तिचा तो सर्वस्वी अपराध. "कारण, लोकांस शिकण्याची इच्छा झाली आहे; ही इच्छा कधीं कधीं स्वाभाविक जिज्ञासेमुळें, कधीं कधीं फाजील चौकसपणामुळें, केव्हां केव्हां मनास विसर पडावा व आनंद व्हावा, केव्हां केव्हां मान मिळावा ह्मणून व कध भूषणादाखल, उत्पन्न झालेली असते. पण आपल्या विचार- शक्तीचें फळ, माणसाच्या फायद्याकरितां किंवा उपयोगाकरितां देतां यावें ह्यास्तव शुद्ध मनानें ज्ञानार्जनाची इच्छा नसते. चौकस व अधीर प्रकृतीला विश्रांतीस्तव जागा असावी, अथवा चंचल व सतत बदलणाऱ्या अशा मनाला, जेथून चांगला देखावा पाह- ण्यास सांपडेल, अशी एक फिरण्यास गच्ची सांपडावी, अथवा गर्विष्ठ मनाला आश्रयास एखादा बुरूज सांपडावा, किंवा तंटे व शब्दयुद्ध करण्यास माऱ्याचा किल्ला असावा, अथवा नफा- तोटा करणारें दुकान असावें, अशा उद्देशानें ज्ञानार्जन केलें जातें. ईश्वराच्या गुणानुवादाचें कोठार, किंवा मनुष्याची वस्तुस्थिति सुधारण्याचें साधन हा ज्ञानार्जनाचा उद्देश नसतो.”


 १ शेक्सपियर. २ बेकन.